उत्तर महाराष्ट्र

"कोरोना' जो पर्यंत जात नाही...तोपर्यंत मी दाढी करणार नाही !

सकाळवृत्तसेवा

पाचोरा :  कोरोना संसर्गाने दोन महिन्यांपासून अक्षरश: थैमान घातले आहे. शहरासह तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही, तोपर्यंत दाढी काढणार नाही असा संकल्प येथील नगराध्यक्ष संजय गोहील यांनी केला आहे.
 
कोरोनाच्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासन व प्रशासनातर्फे विविधांगी उपाययोजना केल्या जात असल्या तरी कोरोनाची लागण आटोक्यात यायला तयार नाही. रुग्णसंख्या व मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. पाचोरा शहरातही गेल्या मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन प्रचंड हादरले. महसूल, पोलीस, आरोग्य व पालिका विभागाने आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाची लागण आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे रुग्णसंख्या २३ वर थांबली. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून १९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अवघा एक रुग्ण रुग्णालयात उपचारार्थ दाखल असून त्याचीही प्रकृती सुधारली आहे.

उर्वरित सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे असले तरी कोरोना संक्रमणाची भीती कायम असल्याने लॉकडाउन, संचारबंदी आदी उपाययोजनांवर भर दिला जात आहे. पालिकेचे नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून विविधांगी उपाययोजनांमध्ये सहभाग घेतला आहे. दुसरीकडे कोरोना हद्दपार झाल्याशिवाय दाढी काढणार नाही असा त्यांचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यांच्या या संकल्पाचे व निर्धाराचे कौतुक होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing Time: SEBI चा मोठा निर्णय! शेअर बाजाराचा क्लोजिंग टाइम बदलला; आता कोणत्या पद्धतीने बंद होणार, काय बदललं?

Mumbai Sawantwadi Express : गणेशोत्सवापूर्वी चाकरमान्यांना मोठं गिफ्ट! मुंबई-सावंतवाडी दरम्यान धावणार नवीन एक्स्प्रेस; 'या' 22 स्थानकांवर थांबणार

ना सातारा, ना कोल्हापूर; कुठे सुरू आहे स्टार प्रवाहची नवी मालिका 'लाडक्या नाईक बाईं'चं शूटिंग? ऐश्वर्या नारकरांनी दाखवला सेट

Mumbai News: बदलत्या मुंबईतही टिकला १२८ वर्षांचा वारसा, १८९८ मध्ये सुरू झालेल्या किराणा दुकानाची चौथी पिढी सांभाळतेय धुरा

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणातून दुपारी 3 वाजता मुठा नदीत 29,117 क्युसेक विसर्ग; पाटबंधारे विभागाचा महत्त्वाचा इशारा

SCROLL FOR NEXT