उत्तर महाराष्ट्र

माणुसकीचा ओलावा...परप्रांतीय महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी तरुणांची पदरमोड !  

सकाळवृत्तसेवा

चोपडा : समाजात अजूनही काही माणसांमध्ये भावना व माणुसकीचा ओलावा अजूनही जिवंत असल्याची जाणीव घटना वेले (ता. चोपडा) येथे घटनेवरून अनुभवला आली. ओडिशा येथील ३५ वर्षीय महिलेच्या अंत्यसंस्कार काही तरुण युवक व सामाजिक कार्यकर्ते सागर बडगुजर, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील व माजी आमदार कैलास पाटील यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करीत अंत्यविधी पार पाडला. 

तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीत कस्तुरा बुटीका (वय ३५) ही काम करीत होती. तिचे बुधवारी (ता. १) अल्प आजाराने दुपारी एकला निधन झाले. त्या आजारी होत्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी माजी आमदार कैलास पाटील यांनी अर्थसहाय्य केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत पती पंकज बारगडे (खामगाव) हे होते. दरम्यान, कोरोनामुळे संचारबंदी लागू असल्याने त्यांचा मृतदेह गावी घेऊन जाणे अवघड असल्याने चोपडा येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी सागर बडगुजर या सामाजिक कार्यकर्त्यानी पुढाकार घेतला. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्‍य दीपक पाटील, मनोहर पाटील, जिंतेंद्र पाटील (सनपूले), अक्षय, शंकर जैन, रश्मी रंजनदास (रा. ओडिशा) यांनी खांदा लावला. तसेच राजेश पाटील, गणेश पाटील, चतुर पाटील, अमर संस्थचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी सहकार्य केले. वेले येथील दीपक पाटील यांनी मृताच्या नातेवाइकांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. मृत बूटीका यांचे पती पंकज बारगडे यांनी अग्निडाग दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT