उत्तर महाराष्ट्र

"सेतू'च्या 18 सेवा झाल्या "डिजिटल' 

देविदास वाणी ः सकाळ वृत्तसेवा

"सेतू'च्या 18 सेवा झाल्या "डिजिटल' 


जळगाव ः सेतू सुविधा केंद्रातून अगदी बोटावर मोजण्याएवढ्या सेवा डिजिटल झाल्या होत्या. आता मात्र तब्बल 18 सेवा डिजिटल होऊन ऑनलाइन प्रणालीद्वारे नागरिकांना मिळत आहेत. दोन ते दहा दिवसांच्या आत सर्वच प्रकारचे नागरिकांना लागणारे दाखले सेतू सुविधा केंद्रातून मिळत आहेत. 

सेतू सुविधा केंद्रातून पूर्वी उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला हीच प्रमाणपत्रे डिजिटल स्वरूपात मिळत होती. याशिवाय, इतर दाखल्यांसाठी नागरिकांना सेतू सुविधा कक्षात फेऱ्या माराव्या लागत असत. यामुळे जिल्हा प्रशासनाने बहुतांश नागरिकांना लागणाऱ्या प्रमाणपत्रांच्या सेवा कमी कालावधीत मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. यामुळे नागरिकांना "महसूल'च्या अठरा सेवा ऑनलाइन मिळू लागल्या आहेत. जे प्रमाणपत्र पाहिजे आहे, त्यासंबंधी अर्ज करून योग्य ती कागदपत्रे सेतू सुविधा केंद्रात द्यावी लागतात. त्यांनी दिलेल्या तारखेनुसार त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्याच गावातील ई-सेवा केंद्रातून दाखले मिळत आहेत. त्यासाठी त्यांना ग्रामीण भाग सोडून जिल्हास्तरावर येण्याची गरज नाही. 

सेतू सुविधा डिजिटल झालेल्या सेवा 
वय राष्ट्रीयत्व व डोमिसाइल प्रमाणपत्र, वय राष्ट्रीयत्व व डोमिसाइल विथ अफेडेविथ, अल्पभूधारक प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मायग्रांट कास्ट प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर विथ ऍफेडेविथ, नॉन-क्रिमिलेअर रिनिव्हल प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, विशेष सहाय्यकारी योजनांचे प्रमाणपत्र, ऐपत प्रमाणपत्र आदी. 

30 टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र 
शासकीय नोकरीत महिलांना 30 टक्के कोटा राखीव असतो. त्याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना तहसीलदारांतर्फे घ्यावे लागते. हे प्रमाणपत्र पंधरा ते वीस दिवसांत मिळते. 

सेतू सुविधा केंद्रातून आता आधीपेक्षा त्वरित दाखले दिली जातात. जातीसह विविध प्रमाणपत्रे डिजिटल स्वाक्षरीने "आपले सरकार सेवा केंद्रा'तून नागरिकांना उपलब्ध होते. ग्रामीण भागातील लोकांची यामुळे चांगली सोय झाली आहे. त्या- त्या प्रांताधिकारी कार्यालयात त्यांचे लॉगइन टेबल आहेत. प्रांताधिकारी "डिजिटल साइन'ने सह्या करतात. 
- स्वप्नील पाटील, जिल्हा समन्वयक, महाऑनलाइन सेवा केंद्र 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT