dada bhuse 
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी पुढील महिन्यापासून कर्ज प्रक्रिया : कृषिमंत्री दादा भूसे 

विलास जोशी

वाकोद (ता. जामनेर) ः सध्या संपूर्ण जगाच्या पाठीवर मोठे संकट आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात लॉकडाउन सुरु आहे. यादरम्यान शेतकरी व शेतीशी संबंधीत सर्व कामांना यातून वगळण्यात आले असून या लॉकडाउन दरम्यान शेतकरी आपली कामे करू शकतो. तसेच पुढेही शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात येतील; मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या सुचना बॅंकांना देण्यात आल्या असून, पुढीत महिन्यापासून कर्ज प्रक्रिया सुरू करणार असल्याचे असे मत महाराष्ट्र कृषीमंत्री दादा भूसे यांनी "सकाळ'कडे व्यक्त केले. 


शेतकरी व त्यांच्या समस्या यविषयावर कविवर्य ना. धों. महानोर यांची मुलाखत "सकाळ'मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या संबंधात त्यांनी आपली प्रतिक्रिया "सकाळ'कडे व्यक्त केली. यावेळी कृषी मंत्री भूसे यांनी कविवर्य ना. धों. महानोर यांच्याशी देखील वार्तालाप करत त्यांना आश्वस्त केले 
दरम्यान "सकाळ'ने प्रत्यक्ष कृषी मंत्र्यांशी संवाद साधुन कविवर्य महानोर यांनी व्यक्त केलेली खंत सांगितल्या त्यावर बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त करत शेतकऱ्यांना आपला माल बाजारात घेऊन जाण्यासाठी अडचण येणार नाही. तसेच खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून लागणारे बियाणे, खते, ठिबक, शेती पूरक साहित्य यांचे नियोजन झाले असून बॅंकांना देखील शेतकऱ्यांना सढळ हाताने कर्ज वाटप करुन सहकार्य करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कर्ज प्रक्रिया पुढील महिन्यात सुरु होईल. तसेच पिकविमा देखील केवळ कापूस पिकाचा राहिलेला असून तो देखील लवकरच वाटप करण्यात येईल असे देखील मंत्री भुसे यांनी सांगितले. शेतात देखील शेतकरी व शेत मंजूर यांनी सोशल डिस्टन्स सांभाळून कामे करू शकतात असे मत कृषी मंत्री दादा भूसे यांनी "सकाळ'कडे मांडले. 

पिकांच्या नुकसानीची जाण 
तसेच कविवर्य महानोरांनी व्यक्‍त केलेल्या खंत विषयी बोलतांना सांगितले, की त्यांच्या भावनांशी मी पूर्णपणे सहमत आहे. त्यांनी मांडलेल्या समस्याबाबत सर्वच परिपूर्ण आहे; असे मी म्हणनार नाही. परंतु प्राप्त परिस्थितीत शेतकरी हिताचे नियोजन सुरु आहे. अनेक पिकांचे नुकसान देखील झाल्याचे मान्य करतो. पीएम किसानचे निधी अद्याप मिळाला नाही; याबाबात केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी देखील व्हिसीद्वारे बोलने झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT