farmer 
उत्तर महाराष्ट्र

कोरोनाच्या संकटातही शेतकरी झाला लखपती...महिलांनाही दिला रोजगार

वासुदेव चव्हाण

शहापूर (ता. जामनेर) : देशभरात कोरोनाचे सावट असल्याने शेती उद्योगासह सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. मात्र अश्याही स्थितीत चिंचखेडा त.वा. (ता. जामनेर) येथील अजय ठोंबरे या शेतकऱ्याने एकरी एक लाख रुपये चवळीचे उत्पन्न घेतले आहे.

श्री. ठोंबरे दरवर्षी भाजीपाल्याचे उत्पन्न घेतात. यावेळी त्यांनी एक एकर क्षेत्रावर चवळी व एक एकरवर भेंडीची लागवड केली. महिन्याभरापासून चवळीच्या उत्पादनास सुरूवात झाली असून, आतापर्यंत एक लाख रुपयांचे उत्पन्न आले आहे. सध्या कोरोनामुळे बाजारपेठेत विक्री न करता, परिसरातील गावामध्ये ४० रुपये प्रतिकिलो दराने किरकोळ हातविक्री करण्यात येत आहे. त्यातून एक लाख रुपये मिळाले असून, आजपर्यंत चाळीस हजार रुपये खर्च आला आहे. अजून एक महिना चवळीचे उत्पादन येणार आहे. शेंगा तोडण्यासाठी दररोज सहा महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. चवळीवर जास्त कीटकनाशकाची फवारणी न केल्याने शेंगा चविष्ट व गुळचट आहेत. त्यामुळे बहुसंख्येने शेंगा विक्री शेतावरच होत आहे. यासाठी लहान भाऊ अतुल ठोंबरे मेहनत घेत आहेत. तसेच भेंडीचे सत्तर हजार रुपयाचे उत्पन्न झाल्याची माहिती श्री. ठोंबरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

FDA Crime : पळा पळा अधिकारी आले...; दुकाने बंद करून अनेक व्यापारी गेले पळुन

Khadakwasala Bridge : खडकवासला पुलाचे आयुष्य वाढले; जड वाहतूक लवकरच होणार सुरू

SCROLL FOR NEXT