live
live 
उत्तर महाराष्ट्र

कालिका मातेची आरती अन् प्लॅस्टीक हटविण्यासाठी अखेरचे अल्टीमेटम 

सकाळवृत्तसेवा

नाशिक- कारवाई प्रिय म्हणून प्रसिध्द असलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कालिका यात्रा उत्सवातील पहिल्या मानाच्या आरती नंतर मंदिर आवारातील प्रसादाच्या स्टॉलला भेट दिल्यानंतर प्लॅस्टीकचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे आढळून आल्याने संतप्त झालेल्या मुंढे यांनी मंदिराच्या विश्‍वस्तांना धारेवर धरतं, विक्रेत्यांनाही बुधवार संध्याकाळ पर्यंतचे अल्टीमेटम देत प्लॅस्टीक पिशव्या हद्दपार करण्याचे आदेशित केले. अन्यथा कारवाईचा ईशारा दिल्याने मुंढेचा झटका विश्‍वस्तांसह विक्रेत्यांना चांगलाचं जिव्हारी लागला आहे. 

नाशिकचे ग्रामदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या कालिता माता यात्रोत्सवाला आज पासून उत्साहात सुरुवात झाली. मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षी महापौर व आयुक्तांच्या हस्ते मानाची आरती होत असते. परंपरेनुसार महापौर रंजना भानसी व आयुक्त तुकाराम मुंढे यांना निमंत्रित करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आयुक्त मुंढे यांनी मंदिर आवारात प्रवेश केल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टीकचा वापर होत असल्याचे आढळून आले.

मंदिर विश्‍वस्तांच्या वतीने आयुक्त मुंढे व महापौर भानसी यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर देवीची आरती करण्यात आली. आरती नंतर आयुक्त मुंढे यांनी मंदिर परिसरातील प्रसादाच्या स्टॉलला भेट देत पाहणी केली. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दोन दिवसांपुर्वी प्लॅस्टीक बंदीची कडक अंमलबजावणीसाठी थेट दुकानांचे परवाने रद्द करण्याचे आदेशित केले आहे. त्याची आठवण आयुक्त मुंढे यांनी दुकानदार व विश्‍वस्तांना करून दिली.

बुधवारी संध्याकाळ पर्यंत प्लॅस्टीक न हटविल्यास थेट कारवाईचा ईशारा त्यांनी दिला. कालिका माता संस्थानच्या पदाधिकायांना देखील प्लॅस्टीक बंदीचे व त्याचे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची जाणीव करून दिली. संस्थानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक केशव पाटील यांना दिल्या. इको-फ्रेण्डली पिशव्या दाखविल्या, भाविकांना यातूनचं प्रसाद दिला जात असल्याचे सांगितले. 

तर दुकानांवर कारवाई 
कालिका माता यात्रौत्सवा दरम्यान जुना आग्रा महामार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे गडकरी चौक ते संदीप हॉटेल दरम्यान व्यावसायिक गाळ्यांची निर्मिती केली जाते. परंतू यंदा पोलिसांनी परवानगी नाकारतं फक्त एकाचं बाजूने दुकाने थाटण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला दुकाने लागल्यास तातडीने हटविण्याच्या सुचना आयुक्त मुंढे यांनी अतिक्रमण विभागाला दिल्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT