उत्तर महाराष्ट्र

पंधरा दिवसात एकाच गावातील सहा जणांचा मृत्यू; आणि गावकऱ्यांची अनोखी श्रध्दांजली

योगीराज ईशी


कळंबू  : गेल्या पंधरा दिवसांत शहादा तालुक्यातील कळंबू येथे वृद्ध, तरुण व मध्यम वयोगटातील अशा चार ते पाच जणांचा विविध कारणांमुळे व विविध ठिकाणी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 


गेल्या पंधरा दिवसांत चार जणांचा वृद्धपकाळाने तर दोन तरुणांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याने गावात गुढी पाडव्याच्या दिवशी गावकऱ्यांनी गुढी न उभारता मृतांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत अनोखी श्रद्धांंजली वाहिली.

सर्वत्र कोरोनाने हाहाकार उडवला असून दुसऱ्या लाटेत बहुतेकांना आपला जीव गमवावा लागल्याने त्यांच्या जाण्याने परिवारात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

अशा घडल्या घटना..

येथील राजेश रोहिदास बोरसे (वय २८) या तरुणांचे गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये ८ मे २०२० रोजी कोविडच्या नियमांचे पालन करीत विविह झाला होता. तो नोकरीनिमित्त गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथे कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता.

परंतु त्याला काही दिवसांपूर्वीच बरे नसल्याने बडोदा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना १० एप्रिल रोजी निधन झाले. यामुळे पत्नीसह आई, वडील, भाऊ पोरके झाले.

तर राजेंद्र धनाजी देवरे (वय ५४, रा. कळंबू, ह. मु. लोणखेडा, ता. शहादा) हे धुळे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवारी (ता.१२) निधन झाले. ते लोणखेडा येथील लोकनायक सूतगिरणीत इलेक्ट्रिक इंजिनियर पदावर कार्यरत होते.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. तर येथील व्यावसायिक भगवान राजाराम महाले यांचे अल्प आजाराने निधन झाले. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT