उत्तर महाराष्ट्र

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइनच व्हाव्यात 

जगन्नाथ पाटील


कापडणे : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करताना सर्वसमावेशक धोरण राबवावे. तसा शासन निर्णय करणे गरजेचे आहे. २०१८- १९ मध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया होण्यापूर्वी, रिक्त जागांवर तसेच संभाव्य बदली पात्र शिक्षकांच्या रिक्त जागांवर होणाऱ्या सेवा ज्येष्ठतेप्रमाणे विनाअट बदली करावी. अवघड क्षेत्र किंवा सर्वसाधारण क्षेत्र या ऐवजी पेसा कायदा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवावी. सर्वसाधारण बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच झाल्या पाहिजे अशी मागणी धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदन देत केली. 

निवेदनात म्‍हटले आहे की, बदली प्रक्रिया करताना एकूण आदिवासी भागात झालेली सेवा धरून सेवा ज्येष्ठता यादी तयार करावी. त्यानुसार बदली करण्यात यावी. संवर्ग एक मध्ये ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील यांना पक्षाघात झाला असेल त्यांना संवर्ग एक मध्ये घेण्यात यावे. बदली प्रक्रिया पूर्वी संभाव्य बदली पात्र शिक्षकांची संवर्ग निहाय यादी प्रदर्शित करावी. सर्वसाधारण बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात याव्यात. बदलीसाठी ३० मे ऐवजी ३० जून ग्राह्य धरावी. एका शाळेवर प्रशासकीय बदली पाच वर्षे व विनंती बदलीसाठी तीन वर्ष सेवेची अट धरावी. जिल्हा बदलून आलेल्या शिक्षकांची विनंती बदलीसाठी पूर्वीच्या जिल्ह्यातील सेवा ग्राह्य धरावी. संवर्ग एक मधील शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी कसून करावी. खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्या निवेदनात आहेत. यावेळी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष संजय पोतदार, जिल्हा सरचिटणीस शरद पाटील, जिल्हा नेते मनोहर शिंदे, सह चिटणीस सुधीर सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष विजय देवरे, धुळे तालुका अध्यक्ष मिलिंद चौधरी, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे आदी उपस्थित होते. 


महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ हा नेहमी शिक्षकांच्या हितासाठी लढत राहिला आहे . शासन नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मी स्वतः ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी सविस्तर चर्चा करेन. योग्य तो निर्णय घेतला जाईल. 
-जयंत पाटील, जलसंपदामंत्री  

संपादन- भूषण श्रीखंडे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET SCAM : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट ! सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचे कॉलेजकडून निलंबन

ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Kerala CM VD Satheesan : कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन? 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक...

Latest Marathi News Live Update : श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमासाच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या ५० तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

SCROLL FOR NEXT