उत्तर महाराष्ट्र

खानदेशात आजपासून उडणार लग्नाचे बार 

जगन्नाथ पाटील


कापडणे : खानदेशात कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुवारी सायंकाळी गावागावांत खोपडीचे पूजन आणि तुलसीविवाह लावण्यात आला. त्यामुळे आज पासून विवाहाचे बार उडणार आहेत. पन्नास वऱ्हाडींना परवानगी असल्याने लॉकडाउनमध्ये थांबविलेल्या आणि आठ महिन्यांपासून वेटिंगवर असलेल्या वधू-वरांना विवाहाची संधी उपलब्ध झाली आहे. २७ नोव्हेंबर सर्वांत मोठी तिथी आहे. 


खानदेशात आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीदरम्यान विवाह बंद असतात. कार्तिकी एकादशीला उसाच्या खोपडीचे प्रत्येक भाऊबंदकीत सार्वजनिक पूजन होते अन्‌ दुसऱ्या दिवसापासून विवाहाचा धूमधडाका सुरू होत असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० वऱ्हा‍डी उपस्थित राहणार आहेत. यामुळे खर्चात बरीच बचत होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे, तर हौशी मंडळींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 

कापसाला मिळणार साडेसहा हजारांचा भाव 
कार्तिकी एकादशीला उसाच्या खोपडीचे पूजन झाल्यानंतर लहान मुलाला खोपडीत बसविले जाते. त्याला शेतमालाचे भाव विचारण्याची परंपरा आहे. कापसाला साडेसहा हजार, बाजरी, ज्वारी, मका, गहू यांना अनुक्रमे प्रतिक्विंटल एक हजार सातशे, अडीच हजार, एक हजार आठशे आणि दोन हजारांच्या भावाचा अंदाज वर्तविला. कापसाचे भाव अधिक वाढणार असल्याने शे‍तकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT