live
live 
उत्तर महाराष्ट्र

चेन्नईचा निर्मल,बंगळुरूचा रूहान जेके टायर एमएमएससीआय नॅशनल कार्टींगचा मानकरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक-बंगळुरू- येथे झालेल्या जेकेटायर-एफएमएससीआय राष्ट्रीय कार्टींग अजिंक्यपद स्पर्धेत चेन्नईच्या निर्मल उमाशंकर आणि बंगळुरूचा रूहान अल्वा यांनी एक्स-३० या वर्गवारीत आपले वर्चस्व राखत मानाचा किताब पटकावला.

निर्मल हा जेकेएनआरसीमध्ये प्रतिनिधीत्व करणारा स्पर्धेक म्हणून परिचित आहे. त्याने अखेरच्या पाचव्या व अंतिम फेरीत वरिष्ठ गटात मायलेच्या साथीने २३ गुण संपादन करत १६० गुणांची कमाई केली. बंगळुरूचा आदित्य स्वामीनाथन (१०१ गुण) आणि दिल्लीचा देबारूण बॅनर्जी(८१) गुण मिळवत पोडीयम स्थानी पोहचणारे स्पर्धेक ठरले.

मेको कार्टोपियाच्या ठिकाणचे अल्हाददायी वातावरण आणि स्पर्धेकांचा उत्साह यामुळे आठवड्याची सुरवात आनंददायी झाली.एक्स-३० ही गटाची स्पर्धा सुरु असतांना आणि अंतिम टप्प्यात जेके टायर नॅशनल कार्टींग चॅम्पियनशिपमध्ये चुरस दिली. सोडी ज्युनिअर आणि सोडी सिनियर या गटातील पात्रता फेरीच्या सुरवातीने सर्वांचे लक्ष हे ट्रकवर झालेल्या मुलांच्या सादरीकरणाने वेधले.  देशभरातील बहुतांश उत्साही प्रेमी येथे पहायला मिलाले.

नवी दिल्ली,चेन्नई आणि कोईमतूर सह नेपाळच्या मुलींने लक्ष वेधले. आठ वर्षापूर्वी मोटारस्पोर्टस्च्या जनजागृती,पुढाकारासाठी युवक व महिलांचा उत्साह दांडगा दिसला, वीस ते तीस वयोगटातील साऱ्यांनीच चोख कामगिरी बजावत आपले सादरीकरण केले. कार्टींगच्या सुरवातीपासून ते अखेरपर्यतचा प्रेक्षकांच्या उत्साह अवर्णनीय असाच राहिला. आकर्षक संदेशासह कार्टींग खेळाची नेमकी माहिती पोहचविण्याचा त्याचा उद्देश होता. 

कनिष्ठ(ज्युनिअर) गटात स्थानिक स्पर्धेक रूहान अल्वाने दिमाखदार कामगिरी नोंदवत या गटातील मानाचा किताब आपल्या नावे केला. पहिल्या फेरीपासून पाचव्यापर्यत त्याची कामगिरी हवीहवीशी होती. त्याने १६४ गुण संपादन करत आपली गुणांची संख्याही वाढवली.

  दुसरा त्यांच शहरातील मित्र अर्जुन एस.नायर(१३४ गुण) आणि चेन्नईचा रियान मोहमंद यांनी एकूण २४ गुण त्यातील एकूण गुण ९१ मिळवत तिसरे स्थान संपादन केले.

    कॅडेट प्रकारात बंगळूरच्या ईशान मधेश याने याने आपल्या गटात दैदिप्यमान कामगिरी करत अव्वल स्थान राखले. तीन स्पर्धाद्वारे ३६ गुण प्राप्त करण्याबरोबरच १८९ गुणांची महत्वपूर्ण कमाई  करत जेतेपद राखले. अकरा वर्षीय श्रीया लोहिया(पुणे) या चालकांने २७ गुणांच्या बदल्यात १३४ एकूण गुणांची कमाई करत द्वितीय स्थान राखले.

पुण्याचा दुसरा चालक साई शिवा मकेश संकरण यानेही स्पर्धा पूर्ण करत ११७ गुणांसह तिसरे स्थान राखले. 

निकाल असा-प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमाने

कॅडेट गट-

ईशान मधेश(बंगळूर-१८९ गुण),श्रीया लोहिया(पुणे-१३४ गुण),साई शिवा मकेश संकरन(पुणे-११७ गुण)

ज्युनिअर गटात- रूहाण अल्वा(बंगळूर-१६४ गुण),अर्जुन अल्वा(बंगळूर-१३४),रियान मोहमंद(चेन्नई-९१ गुण)

सिनियर गट-निर्मल उमाशंकर(चेन्नई-१६० गुण),आदित्य सुब्रमण्यम(बंगळूर-१०१ गुण),बाला प्रसन्नाथ-(७१ गुण)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT