राज्य बाजार समिती महासघांच्या वतीने उत्कृष्ट कृषी बाजार समिती व्यवस्थापनाचा सन्मान 
उत्तर महाराष्ट्र

22 बाजार समित्यांचा उत्कृष्ट व्यवस्थापनाचा गौरव

दगाजी देवरे

म्हसदी (धुळे) : पुणे येथील महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने आज सकाळी पुणे येथील झांबरे सभागृहात राज्यातील बावीस बाजार समित्यांचा उत्कृष्ट प्रशासन व व्यवस्थापनाचे काम केल्याने गौरव करण्यात आला. त्यात साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचाही समावेश होता.

राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जातो. स्थानिक शेतकऱ्यांना गांवालगतच्या बाजार समित्यांमुळे शेतमाल विकता येतो. यात उत्कृष्ट प्रशासन व व्यवस्थापनाचे  उल्लेखनीय काम करणा-या बाजार समित्यांचा आज सकाळी राज्य बाजार समिती महासघांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकार,पणन व वस्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते राज्यातील बावीस बाजार समित्यांचा सन्मान चिन्ह,प्रशिस्त पत्र,शाल,श्रीफळ देऊन गौरव झाला. सत्कार समित्यांचे सभापती,उपसभापती व पदाधिकाऱ्यांनी स्विकारला. साक्री बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे यांचा मंत्री श्री. देशमुख यांच्या हस्ते गौरव झाला. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी महासघांचे अध्यक्ष दिलीपराव मोहिते-पाटील,माजी आमदार केशवराव मानकर,गजाननराव घुगे,साक्री शेतकरी सहकारी संघाचे सभापती विलासराव बिरारीस उपस्थित होते.

साक्री बाजार समितीत कमी वेळेत प्रगती
साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे गेल्या सहा वर्षांपासून समितीसह शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. समितीने अडत पध्दत बंद करून ' माल घेईल त्याची आडत ' ही पध्दत अमलात आणल्याने शेतकरीही आपला माल विक्रीस प्राधान्य देत आहे. 1964 पासून साक्री बाजार समिती अंतर्गत निजामपूर व पिंपळनेरला उप बाजार समिती कार्यरत आहे. समितीने 2011-13 या कालावधीत शेतकऱ्यांना 63 लाख 21हजार पाचशे रुपयांचे कांदा चाळ बांधकाम अनुदान मिळवून दिले.

कृषी पणन महामंडळाकडून विकासासाठी दोन कोटी 49 लाख 47 हजारांचे कर्ज मिळवले. यातून बाजार समितीच्या आवारात कार्यालयीन इमारत,आवाराचे काँक्रींटीकरण,लिलाव ओटे,स्वच्छतागृह,पिंपळनेरला कार्यालयीन इमारत,संरक्षक भिंत,लिलाव ओटे,निजामपूर उपबाजारात रस्ता काँक्रींटीकरण,संरक्षक भिंत,कव्हर शेड,तळफरशीची कामे झाली आहेत. निजामपुरच्या उप बाजार समितीच्या आवारात आशियाई बॅकेंच्या आर्थिक सहाय्याने कृषी पणन मंडळाने हब व स्कोप स्थापन केले आहे. केंद्र शासनाकडे सौर व पवनऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रकल्प उभा राहील्यास पवनऊर्जा वापरणारी साक्री बाजार समिती राज्यातील पहिली बाजार समिती ठरणार आहे. अशा अनेक योजनांचा उत्कृष्ट उपयोग केल्याने बाजार समितीचा गौरव झाल्याची माहिती सभापती श्री. सोनवणे यांनी "सकाळ"ला दिली. बाजार समितीला गौरविल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते,आमदार डी. एस. अहिरे,जेष्ठ नेते सुरेश रामराव पाटील,बाजार समितीच्या सचालकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा; ८५०० कोटींची देणार भेट, यंत्रणा तैनात पण अधिकृत घोषणा नाही

Mumbai: ७५ प्रवासी असणाऱ्या विमानाचं चाक हवेतच निखळलं अन्...; मुंबई विमानतळावर धक्कादायक घटना

Mangalwedha News : सोलापूर जि. प. अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव, मंगळवेढ्यातील हालचालीना गती

दुर्दैवी ! बिल्डिंगवरून पडल्याने 37 वर्षीय अभिनेत्याने गमावला जीव

Latest Marathi News Updates Live : सर आम्हाला सोडून जाऊ नका, विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा

SCROLL FOR NEXT