उत्तर महाराष्ट्र

एकाच विहिरीत पडून संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : काही दिवसांपूर्वी आडगाव (ता. चाळीसगाव) येथे ज्या विहिरीत पडून वडिलांचा मृत्यू झाला, आज (मंगळवार) मुलासह आईचा त्याच विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आडगाव शिवारात दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. याामुुळे परिसर सुन्न झाला आहे.

मेहुणबारे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव येथील आशाबाई राजेंद्र पाटील (वय 35) व मुलगा गौरेश राजेंद्र पाटील (वय 11) हे दोघे स्वतःच्या शेतात गेले होते. आज दुपारी साडे तीनच्या सुमारास मुलगा गौरेश बोर खाण्यासाठी बोराच्या झाडाकडे गेला होता.

बोराच्या झाडाजवळच विहीर आहे. त्या दरम्यान तो विहिरीत पडला. हे आई आशाबाई यांच्या लक्षात आले असता, त्यांनी विहिरी जवळ जाऊन पाहिले व त्याही विहिरीत पडल्या. विहीर खोल असल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी त्याच विहिरीत मुलाचे वडील राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ सुन्न झाले आहेत.

दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक नजीम शेख हे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT