उत्तर महाराष्ट्र

नांदगाव महाविद्यालयात स्काईपद्वारे ऑनलाईन व्याख्यानमाला

सकाळवृत्तसेवा

नांदगाव : शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आमूलाग्र बदल घडून येत आहेत. खडू व फळा यांची जागा आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ने घेतली आहे आणि तंत्रज्ञानाच्या या चढाओढीत ग्रामीण भागातील महाविद्यालय सुद्धा मागे नाहीत असे नांदगाव महाविद्यालयाने ऑनलाईन व्याख्यान घेऊन दाखवून दिले आहे.

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथील रसायनशास्र विभाग विद्यार्थी हिताचे नवनवीन उपक्रम घेण्यात नेहमीच अग्रेसर आहे.

नुकतेच जर्मनी येथील संशोधन तज्ञ डॉ दिनेश सावंत यांनी रसायनशास्र विषयातील तृतीय वर्ष वर्गातील विदयार्थ्यांना भारत व परदेशातील संशोधनाच्या संधी व त्यासाठी फेलोशिप देणाऱ्या विविध संस्था या विषयी सखोल मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात विदयार्थी व्हिडीओ कॉन्फरनसिंग द्वारे संवाद साधून त्याविषयी सखोल माहिती जाणून घेतात.

आतापर्यंत जगभरातील व भारतातील नामांकीत संशोधन संस्थेतून एकूण नऊ ऑनलाईन व्याख्यान घेतले गेले आहेत. ऑक्टोबर महिन्यात महाविद्यालयास भेट दिलेल्या नॅक समितीने या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रसायनशास्र  विषयातील बारकावे समजून भविष्यात संशोधन करण्याविषयी आवड निर्माण होते आहे, असे मत विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

अशा प्रकारचे स्काईपद्वारे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  व्याख्यान घेणारे नांदगाव महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे, असा दावा  या व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ पवन तांबडे यांनी केला.

याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध महाविद्यालये अशा प्रकारचे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  व्याख्यान घेण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. रसायन शास्त्र विभागाप्रमाणेच महाविद्यालयातील इतर विभागसुद्धा हा उपक्रम राबविणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आय पटेल यांनी सांगितले आहे.

संस्थेचे तालुका संचालक दिलीपदादा पाटील, प्राचार्य डॉ एस आय पटेल, विभागप्रमुख डॉ मनोज गवारे यांनी या व्याख्यानमालेचे आयोजक डॉ पवन तांबडे यांचे विशेष अभिनंदन केले.

या करिता प्रा. भरत शेळके , दीपक गोराडे व शंकर थोरात  यांनी विशेष परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT