residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

विद्यार्थ्यानो ऐका...एप्रिलमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा,

सकाळ वृत्तसेवा

नाशिक- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुढील वर्षी (2020) होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार विविध पदांसाठी पूर्व, मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. पदनिहाय पुढील भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये, तर मुख्य परीक्षा ऑगस्ट 2020 मध्ये होईल. 

दरम्यान, हे वेळापत्रक अंदाजित आहे. जाहिरातीच्या किंवा परीक्षांच्या प्रस्तावित तारखांत बदल होऊ शकतो, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी नियमित संकेतस्थळाला भेट द्यावी. लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि अन्य विविध कारणांमुळे परीक्षा प्रक्रियेची गती मंदावलेली होती. अशातच सन 2020 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाल्याने उमेदवारांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. 

परिक्षेला सामोरे जाण्याची तयारी

    वेळापत्रकाचा अंदाज घेऊन त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करण्यात सध्या युवक-युवती व्यस्त आहेत. बहुतांश परीक्षांच्या अभ्यासक्रमात काहीसे साम्य असल्याने जास्तीत जास्त परीक्षांना सामोरे जाण्याची तयारी तरुणाईकडून केली जाते आहे. संबंधित परीक्षांतून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा तपशील जाहिरात किंवा अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही नमूद केले आहे. 

संभाव्य वेळापत्रक असे 
परीक्षेचे नाव जाहिरात पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा 

* राज्यसेवा परीक्षा डिसेंबर 2019 5 एप्रिल 2020 8 ते 10 ऑगस्ट 2020 
* दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ- जानेवारी 2020 1 मार्च 2020 15 जून 2020 
स्तर व न्यायदंडाधिकारी 
* सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जानेवारी 2020 15 मार्च 2020 12 जुलै 2020 
* महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्‍त- फेब्रुवारी 2020 3 मे 2020 --- 
पूर्व परीक्षा 2020 
* महाराष्ट्र वनसेवा परीक्षा मार्च 2020 10 मे 2020 11 ऑक्‍टोबर 2020 
* महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT