उत्तर महाराष्ट्र

मृत कर्मचारी करणार  मलेरियाची औषध फवारणी 

सकाळ वृत्तसेवा

मृत कर्मचारी करणार 
मलेरियाची औषध फवारणी 

जळगाव : शहर महापालिका आर्थिक घोटाळे, गैरव्यवहार आणि आरोप-प्रत्यारोपांनी कायम चर्चेत असते. आता मात्र मृत कर्मचाऱ्याच्या बदलीचे आदेश काढून महापालिका प्रशासनाने चक्क कळस गाठला आहे. 
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे औषध फवारणीसाठी 54 कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्या सर्व कर्मचाऱ्यांना मलेरिया विभागात बदली करून फवारणी, धूरळणीचे काम सोपवण्यात आले आहे. महापालिकेच्या 54 कर्मचाऱ्यांमध्ये यादीनुसार 17 क्रमांकावरील नाव असलेल्या बांधकाम विभागातील वामन फुलचंद माळचे यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले असून, त्यांची देखील औषध फवारणीसाठी मलेरिया विभागात बदली करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता.16) काढण्यात आलेल्या या आदेशावर उपायुक्त दंडवते यांची स्वाक्षरी देखील आहे. रात्री उशिरा ही यादी व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर व्हायरल झाली होती. चौकशी केल्यावर घडला प्रकार सत्य असल्याचे समोर आले आहे. 

चौकट 
...असा उघड झाला प्रकार 
मृत कर्मचारी वामन फुलचंद माळचे यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला आहे. वडील आजारी असताना त्यांचा मुलगा सोबत कामावर येत असल्याने यादी औषध फवारणीसाठी यादी जाहीर झाल्यावर मुलगा आरोग्य विभागात धडकला. अनुकंपा तत्त्वावर अद्याप आपल्याला घेतले नाही म्हणून त्याने चौकशी केल्यानंतर घडला प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. 
----------- 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT