marathi news muktainagar rashtrawadi ravindra patil maghar  
उत्तर महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : खडसेंच्या विरोधात राष्ट्रवादीची माघार

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी आज माघार घेतली. त्यामुळे आता आमदार एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकात पाटील यांच्यात सरळ सामना होणार आहे.

मुक्‍ताईनगर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्‍यता होती. मुक्‍ताईनगरमधून भाजपकडून रोहिणी खडसे, राष्ट्रवादी कॉंग्रसचे ऍड. रवींद्रभैय्या पाटील व विनोद तराळ तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, आजच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार उमेदवारी माघार घेतल्याचे विनोद तराळ यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यासह मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी आपले राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठविणार असल्याचेही तराळ म्हणाले.

राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी माघारी घेतल्याने आता मुक्‍ताईनगर मतदार संघातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत भाजपच्या रोहिणी खडसे यांच्या विरूद्ध उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे मुक्‍ताईनगरात आता भाजप विरूद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT