bike chor
bike chor 
उत्तर महाराष्ट्र

दुचाकीवरून येत पळविली साडेचार लाखांची रोकड 

सकाळ वृत्तसेवा

ब्राम्हणपुरी : खेडदिगर येथील कापूस व्यापारी संतोष गुलाबराव चित्ते यांना रात्री साडेआठच्या सुमारास खेतिया येथील मयूर हॉटेलजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी लुटले. साडेचार लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावत फरार झाल. ही घटना शनिवारी(ता.२५) घडली, 

श्री. चित्ते हे आपला कापूस खरेदीचा व्यवसाय मध्यप्रदेश येथील मेलन गावाच्या हद्दीत करतात. कापूस घेणे व संध्याकाळी जिनिग मिलला तो विकतात. हे त्यांचे नित्याचे काम असल्याने काही चोरट्यांनी पाळत ठेवली असावी, त्यातूनच ही घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 


श्री. चित्ते यांनी कापूस विकून रोकडची बॅंग बगलेत धरीत दुचाकीने शनिवारी रात्री आठच्या दरम्यान संचेती कॉटन येथून जात होते. त्याला एकटे पाहून एका अनोळखीने त्यांना मयूर हॉटेलजवळ हात दिला. त्यांनी दुचाकीची गती कमी केली तेवढ्यात मागून दोन अनोळखी त्यांच्या अंगावर धावत आले व पैशाने भरली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न करू लागले. शेजारील रखवालदाराला मदतीस बोलवून ते आरडाओरडा करू लागले. काही नागरिकही मदतीसाठी धावत आले मात्र तोवर चोरट्यांनी पैशांची बॅग घेत तेथून पळ काढला. थोड्या अंतरावर पैसे काढून घेत ती पिशवीही फेकून दिली, ती नंतर मिळून आली. 

या झटापटीत श्री.चित्ते जखमी झाले असून झालेल्या घटनेने त्याचा रक्तदाब वाढल्याने त्यांना लागलीच खेतिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चोरीस गेलेली एकून रक्कम चार लाख पन्नास हजार होती. घटनेची माहिती देऊन खेतिया पोलिस ठाण्यातस्टेशनमध्ये फिर्याद दिली असून चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. खेतिया पोलिस ठाण्याचे राजेंद्र इंगळे तपास करीत आहेत. 
तीन दिवस अगोदर सेधाव परिसरात ही झाली होती अशी घटना गोई-धुळकोट रोडवर्ती झाले होती २२ जानेवारी रोजी वयक्तिक बँक फाईनस चे कर्मचारी यांच्या सोबत काही गुंडांनी लूट केली होती यात त्यांचे ९० हजार रोकड चीन बॅग लुटण्याचा आली होती यात ते आरोपी पकण्यात ही आले होते त्यांच्या कडन ८७७०० रुपये हस्तगत करण्यात आले होते व एक मोटारसायकल,एक बंदूक आदी जप्त करण्यात आले होते 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT