flag fluttered in village 
उत्तर महाराष्ट्र

स्वातंत्र्याच्या तब्बल 75 वर्षानंतर गावात फडकला तिरंगा झेंडा

Nandurbr Independence day News जिल्हापरिषद मार्फत ठेलारपाडा वस्तीवर प्राथमिक शाळा मजूर करून हक्काची शाळा मिळवून दिली.

निलेश पाटील

शनिमांडळ : तालुक्यातील आसाणे पासून 3 किमी अंतरावर जंगलात (Forest) मेंढ्या चारणारा समाज हा ठेलारी समाज (Thelari society) म्हणून ओळखला जातो. सदर समाज हा चारा ज्या भागात असेल त्या भागात स्थलांतर करत असतो. परंतु आसाणे येथे मूळ ठिकाण असलेल्या ठेलारपाडा वस्ती ठिकाणी शेती (Farm) व घर स्थायिक केले आहेत.

पण तरीही 6 महिने पावसाळ्याचे येथे शेती व चाऱ्यासाठी राहतात अन 6 महिने उन्हाळ्याचे जिकडे पाणी व हिरवा चारा उपलब्ध होईल तिकडे स्थलांतर करतात,नेमकी हीच गोष्ट आसाणे येथील भारत पाटील, रवींद्र कांचन पाटील, सावळीराम ठेलारी,सखाराम ठेलारी, मंगा ठेलारी अरुण पाटील, समाधान पाटील,आत्माराम पाटील या सामाजिक कार्यकर्त्यांनी हेरली व वर शासन दरबारी तत्कालीन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल व खासदार हिना गावित,व आमदार श्री विजयकुमार गावित साहेब यांना पाठपुरावा करून जिल्हापरिषद मार्फत ठेलारपाडा वस्तीवर प्राथमिक शाळा मजूर करून हक्काची शाळा मिळवून दिली.

आणि तिरंगा झेंडा फडकला..

कधी काळी शालेय शिक्षणापासून वंचित असणारा मेंढपाळ समाज, जागा मिळेल तेथे चूल मांडणाऱ्या समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला. तेथील समाजाला हक्काचा स्वातंत्र्याचा तिरंगा झेंडा मिळाला. या प्रसंगी थेतील ज्येष्ठ नागरिक श्री घमा ठेलारी यांना झेंडावंदन करण्याचा मान देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''परळीतल्या गल्लीबोळातला स्टार प्रचारक...'', देशमुखांची धनंजय मुंडेंवर सडकून टीका

World AIDS Day 2025: 'ओरल सेक्स'मधूनही एचआयव्ही पसरू शकतो? AIDS संबंधीचे 'हे' Myths आणि Facts जाणून घ्याच

Thane Politics: मविआला धक्का! ठाकरे गटाची भाजपला साथ, राजकारणाचे समीकरण बदलले

Sanjay Raut : आजारपणानंतर संजय राऊत पहिल्यांदाच माध्यमांसमोर; महायुतीवर जोरदार टीका, काँग्रेसला लगावला टोला, प्रकृतीबाबतही दिली अपडेट

Viral Video: चार वर्षांच्या बालिकेला सेविकेची मारहाण, जमिनीवर आपटले अन्... व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

SCROLL FOR NEXT