Movement
Movement 
उत्तर महाराष्ट्र

शेतकरी कायदे विरोधात शहाद्यात लाल बावटा संघटनेचे आंदोलन

सकाळ डिजिटल टीम

शहादा : शेतकरी विरोधी तीन काळे कायदे (Farmers Act) मागे घेण्यात यावे, शेतीमालाला किफायतशीर दीड पट भाव देऊन हमी भावाचा कायदा करण्यात यावा, शेतकरी (Farmer) , शेतमजूर कामगार यांना पिवळे कार्ड देऊन प्रतिव्यक्ती १० किलो धान्य देण्यात यावे, सर्वांना घरकुल देण्यात यावे. आदींसह विविध मागण्यांसाठी आज तहसील कार्यालयाचा आवारात महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) (Maharashtra State Agricultural Workers Union) शहादा तालुका कमिटीच्या वतीने व प्रणित विविध संघटनांनी आंदोलन करुन तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

अशा आहेत मागण्या..
- सर्व ग्रामपंचायतींनी कागद पत्रांची पूर्तता करून लाभार्थीच्या खात्यावर घरकुल साठी अनुदानित दीड लाख टाकण्यात यावे.

- २०२२ पर्यत पक्के घरकुल योजनांची अंमल बजवणी करण्यात यावी. शेतकरी विरोधी तीन काळे कायदे मागे घ्या.

-शेतीमालाला किफायतशीर दीड पट भाव देऊन हमी भावाचा कायदा करा. चार श्रमसंहिता मागे घेऊन शेतमजूर,कामगार,कर्मचारी यांच्या हिताचा कायदा करा.

-२०२० चे वीज विधेयक रद्द करा.,शेतकरी,शेतकरी,कामगार यांना पिवळी कार्ड देऊन प्रतिमाणशी दहा किलो धान्य दया.

- कोरोना मुळे मृत्यू झालेल्या कुटूंबाच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये अदा करा.

-शेतकऱ्यांना शेतीपंपा वरचे व शेतमजुरांच्या घराचे विजबिल मागे घ्या.

- डिझेल, पेट्रोल,व गॅसची दरवाढ रद्द करून महागाईला आळा घाला.

-संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ, वृद्धपकाळ पेन्शनयोजनेच्या लाभार्थीना दरमहा तीन हजार वाढून द्या.

- आशा गटप्रवर्तक,शालेय पोषण आहार कामगारांना कायम करा.
- रोजगार हमीच्या कामाला ६०० रुपये रोज व २०० दिवस काम द्या.

- वन कायदा प्रमाणे वनदावे ताबडतोब मंजूर करून वनपट्टे वाटप करा.

- गायरान जमीन कसणाऱ्यांना सातबाराच्या उतारा देऊन पीक कर्ज अदा करा.

- सबलीकरण योजनेप्रमाणे भूमिहीनांना जमीन वाटप करा.

यांनी दिले निवेदन..

यावेळी निवेदनावर सुनील गायकवाड, उत्तम पवार, खंडू सामुद्रे,रमाकांत पेंटर,संतोष गायकवाड, राजाराम ठाकरे ,प्रताप ठाकरे,प्रकाश नाईक ,कांतीलाल शिंदे ,रत्नाबाई माळी,सुमन बाई ठाकरे,सुदाम चौधरी,सतीलाल महिरे,दिनेश गुलाले,नईम सय्यद, मासुम मन्यार, शेख रफिक,लखा तडवी, आप्पा सुळे,मेहरबान पवार आदींच्या सह्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT