Gram Panchayat Gram Panchayat
उत्तर महाराष्ट्र

पदभार घेण्यावरून अक्कलकुवा ग्रामपंचायती संरपच, बिडीओत वाद

गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या

सकाळ वृत्तसेवा



वाण्याविहीर ः अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) ग्रामविकास अधिकाऱ्यास (Village Development Officer) पदभार देण्यावरून वाद विकोपास गेला आहे. पदभार घेऊ दिला नाही, म्हणून सरपंचांना (Sarpanch) नोटीस (Notice) बजावल्याचा राग आला. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी थेट प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन हुज्जत घातल्याचा आरोप गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी केला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer of Zilla Parishad) व पोलिस अधीक्षकांना (Superintendent of Police) निवेदन देऊन पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. (akkalkuwa gram panchayat bdo sarpanch dispute between)

याबाबत प्रभारी गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ग्रामसेविकांकडे अक्कलकुवा ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. मात्र, त्यांच्यावर कामाचा भार जास्त होत असल्याने त्यांच्‍या जागी ग्रामसेवक आर. आर. वळवी यांच्याकडे कार्यभार सोपविण्याचे आदेश काढले. त्यानुसार श्री. वळवी पदभार घेण्यास गेले असता, त्यांना सरपंचांसह पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. याबाबत ग्रामसेवक वळवी यांनी गटविकास अधिकाऱ्यांना माहिती दिली. गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या.

दालनात घुसून हुज्जत

त्याचा सरपंच, उपसरपंच, इतर सदस्यांना राग आला. त्यांनी अक्कलकुवा पंचायत समितीत जाऊन गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांच्या दालनात घुसून हुज्जत घातली. महिला ग्रामसेविकेकडून पदभार का काढला, याबाबत विचारणा केली. वाद विकोपाला जाऊन पदाधिकारी गटविकास अधिकाऱ्यांवर चालून गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी पोलिसांना पाचारण केले. तत्काळ पोलिस दाखल झाले. नंतर गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी पोलिस अधीक्षक व पोलिस निरीक्षकांकडे स्वसंरक्षणासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत सरपंचांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT