nandurbar bajar samiti 
उत्तर महाराष्ट्र

हमाल-मापाडींच्या दरात १६ टक्के दरवाढ 

धनराज माळी

नंदुरबार : दर तीन वर्षांनी होणारी हमाल मापाडीचा दरवाढीचा प्रश्न माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मध्यस्थीने सुटत दरात १६ टक्के वाढ करण्यात आली आहे. आगामी तीन वर्षासाठीच ही दरवाढ मान्य करीत हमाल मापाडी प्रतिनिधींकडून एक डिसेंबर पासून बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू होणार आहे. 
हमाल मापाडींची तोलाईच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ करण्यात येते. तीन वर्षाचा करार हा ३१ ऑक्टोबरला संपला होता. १ नोव्हेंबरपासून नवीन दर मिळणे आवश्यक होते. परंतु विविध कारणांमुळे ते होऊ शकले नाही. या दरम्यान हमाल- मापाडी यांच्यात बैठकाही झाल्या. मात्र दरवाढीचा निर्णय झालानाही. त्यामुळे गुरुवारी (ता.२६) पासून हमाल मापाडींनी तोलाई व हमालीचे काम बंद केले होते. यामुळे शेतकरी व व्यापारीचा शेतमाल बाजार समितीत उघड्यावर पडून होता. बंदमुळे शेतकरी व व्यापारी देखील चिंतेत होते. याप्रश्‍नी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी हमाल-मापाडींची समजूत काढत दरवाढीबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर गुरूवारी (ता.२६) सकाळी हमाल मापाडींनी शेतकऱ्यांचा माल भरून देण्याची तयारी दाखविली होती. मात्र शुक्रवारी (ता.२७) पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली होती. याच दरम्यान मिरची उत्पादकांचा माल बाजार समितीत पडून राहिल्याने बाजार समिती प्रशासन व पदाधिकाऱ्यांना धारेवर घेतले त्यामुळे यावेळी माजी आमदार रघुवंशी यांच्या मध्यस्थीने शुक्रवारी (ता.२७) व्यापारी प्रतिनिधी, हमाल मापाडी प्रतिनिधी , बाजार समिती संचालक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मिरचीचा लिलाव करून ती मोजून देण्याचे ठरले. त्यानंतर आज (ता.२९) बाजार समितीत शेतकऱ्यांनी माल न आणण्याचे आवाहन बाजार समितीने केल्यानंतर श्री. सूर्यवंशी यांनी यावर मध्यस्थी करत तोडगा काढला. 
 
१६ टक्के दरवाढ 
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दरवाढीच्या बैठकीत बाजार समितीचे सभापती दिनेश पाटील , व्यापारी प्रतिनिधी हरेश जैन, महेश जैन, गिरीश जैन, धीरज जैस्वाल, भूपेंद्र जैन, हमाल मापाडी प्रतिनिधी कैलास पाटील ,संतोष पाटील, देवाजी माळी, डॉ.सयाजी मोरे, संचालक रोहिदास राठोड, भरत पाटील, किशोर पाटील, हिरालाल पाटील, सचिव योगेश अमृतकर, राजेंद्र गिरासे आदी उपस्थित होते. श्री. रघुवंशी यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत १६ टक्के दरवाढ पुढील तीन वर्षासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो व्यापारी व हमाल-मापडी प्रतिनिधींनी मान्य केला. त्यामुळे दरवाढीचा प्रश्न सुटला आहे. मंगळवारपासून बाजार समितीचे कामकाज नियमित सुरू होणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात पावसाचा हाहाकार, मुंबईत ८० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता, नागरिकांनी सतर्क राहण्याचं मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकची एक लेन सुरू, दुसरी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने, प्रवास करण्याआधी चेक करा

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी; उर्से टोलनाक्याचा राडारोडा रस्त्यावर

Koyna Dam Water : पाऊस लांबताच समजले कोयनेच्या पाण्याचे महत्त्व! वीज निर्मिती बंद पडताच वाशिष्ठी कोरडी; पिण्याच्या पाण्यासह उद्योगांवर परिणाम

Pune Rain Alert: वडीवळे धरण ९० टक्के भरलं; मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू; इंद्रायणी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT