उत्तर महाराष्ट्र

नंदुरबारमध्ये अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत उसळली गर्दी !

आंब्याचा मेजवाणीचा दरवळणारा सुगंध यामुळे ग्रामीण भागात तर एक वेगळेच वातावरण दिसून

धनराज माळी


नंदुरबार ः अक्षयतृतीया (Akshay Tritiya Festival ) म्हणजेच खानदेशातील (Khandesh) आखाजी, आखाजीचा सण म्हटला म्हणजे घराघरात पुरणपोळी व आंब्याचा (mango) रस ही मेजवानी ठरलेलीच असते.त्यासोबतच घरात पूर्वजनांचे स्मरण, पूजन आणि अक्षय पूजा किंवा घागर पूजनाला म्हत्व असते. त्यामुळे साडे तीन मुहुर्तापैकीच असलेला व वर्षातून येणाऱी ही आखाजी उद्या (ता.१३) सर्वत्र साजरी होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या अक्षयतृतीयेचा पूर्वसंध्येला आज लॉकडाऊनची (lockdown) मर्यादा पाळत नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत एकच गर्दी (market shopping crowd) केली होती.

(Nandurbar city akshay tritiya festival market shopping crowd)

साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जाणाऱ्या आखाजी या सणाला खानदेशात विशेष महत्व आहे. या सणानिमित्त सासूरवाशिणी माहेरी येतात, आपल्या बालपणीचा मैत्रिणी एकत्र जमून जुन्या आठवणींना उजाळा देतात.घरोघरी दारापुढे, चौकातील झाडांना बांधलेले झोके व त्यावर दूरवर हिंदोळे घेणाऱ्या मैत्रिणी, खानदेशी भाषेतून अर्थात अहिराणी भाषेतून बालपणीचा साचेब्ध केलेले व ग्रामीण भागातील जीवन शैलीचे वर्णन असलेले गीतांचा स्वरांनी परिसर दणदणून जातो. घरोघरी पुरणपोळी व आंब्याचा मेजवाणीचा दरवळणारा सुगंध यामुळे ग्रामीण भागात तर एक वेगळेच वातावरण दिसून येते. त्यामुळे या सणाला विशेष महत्व आहे.



सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT