nandurbar bank 
उत्तर महाराष्ट्र

जिल्हा बॅंकतर्फे १५ पासून एटीएमद्वारे पीककर्ज देणार

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेमार्फत नविन हंगामातील पीक कर्ज वाटपाला १५ एप्रिलपासून सुरवात होत आहे. विशेष म्हणजे मार्चअखेर परतफेड करणाऱ्यांना या कर्जासाठी प्राधान्य देण्यात येणार असून हे कर्ज प्रथमच एटीएमद्वारे वितरित होणार आहे. मागील वर्षीच्या पीककर्ज परतफेडीला ३१ मे २०२० पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे व मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी ही माहिती दिली. 
बॅंकेने याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार जिल्हा बँकेने मागील वर्षी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेडीस ३१ मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुदतवाढीच्या अनषंगाने सर्व पीक कर्जदार सभासदांनी त्यांच्याकडील पीककर्ज ३१ मे २०२० पर्यंत एक लाखापर्यंत ०% दराने व एक लाखांवरील पीककर्जासाठी २% व्याजदराने परतफेड करावयाची आहे. 
नविन हंगामासाठी पीककर्ज वाटप बँकेने मंजूर केलेल्या वाढीव पीककर्ज दरानुसार (उदा. मागील वर्षी कापूस पिकासाठी एकरी एकवीस हजारप्रमाणे वाटप करण्यात आले होते. चालू वर्षी कापूस या पिकासाठी एकरी चोविस हजार रूपयांप्रमाणे वाटप होईल. हे पीक कर्ज रुपे केसीसी क्रेडीट कार्डद्वारे ATM च्या माध्यमातूनच देण्यात येणार आहे. कर्ज रक्कम जिल्हा बँकेच्या व इतर कोणत्याही बँकेच्या ATM मधून वीस हजार प्रमाणे प्रत्येक दिवशी उपलब्ध होईल. खते, बि-बियाणे, कीटकनाशके या सारख्या पेस्टीसाईडसाठी दैनंदिन रक्कम पंचविस हजारचे बिल पेमेंट ATM कार्डद्वारे करता येणार आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या अनुषंगाने रिझर्व बँकेकडून माहे मार्च, एप्रिल, मे २०२० या ३ महिन्या करीताATM साठी इतर बँकांकडून आकारण्यात येणारे चार्जेस आकारणी माफ करण्यात आलेली आहे. 
 
दृष्टीक्षेपात ठळक निर्णय 
- गतवर्षाच्या पीककर्जाच्या पतरफेडीस ३१ मे २०२० पर्यंत मुदतवाढ. 
- ३१ मार्चअखेर परतफेड करणाऱ्यांना प्रथम प्राधान्याने कर्ज वाटप. 
- पूर्ण पीककर्ज वाटप रुपे किसान क्रेडीट कार्ड मार्फत, ATM द्वारे होणार. 
- चालू वर्षी वाढीव पिक कर्ज वाटप. 
- शेतकऱ्यांनी ATM मध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळावे. 
- नविन हंगामासाठी नविन वाढीव पीक कर्जदर. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT