onion 
उत्तर महाराष्ट्र

शेतकरी हतबल...तीन एकरचा कांदा म्हणे मोफत न्या! 

यश पाटील

कहाटूळ : कांद्याला भाव चांगला मिळेल, या आशेने हजारो रूपये खर्च करून तीन एकर क्षेत्रावर कांदा लावला, कांद्याचे भरघोस उत्पादनही आले. मात्र ते काढण्यासाठी मजूर मिळत नाही. ही समस्या गंभीर असतांना व्यापाऱ्यांकडून कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे मजुरीही सुटणार नाही. त्यापेक्षा कांदा ग्रामस्थांना मोफत वाटलेला बरा, असे म्हणत कहाटूळ (ता. शहादा ) येथील शेतकऱ्याने तीन एकरवरील परिपक्व झालेला कांदा लागेल त्याने उपटून घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. 
मागील दोन महिन्यापासून लॉकडाऊन आहे. विशेषत: नाशवंत शेतीमाल उत्पादक शेतकरी लॉकडाउनमुळे अडचणीत आले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पीक उभे करण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही मातीमोल भावात ते विकावे लागले, तर काही शेतकऱ्यांना ग्रामस्थांना शेतात बोलवून कांदे वाटप करण्याची वेळ शहादा तालुक्यात निर्माण झाली आहे. 

एक एकरामागे लावणीपासून मळणीपर्यंत ३० हजार रुपये खर्च करावा लागतो. जानेवारीपासून शेतकरी राबत होता. सध्या कांद्याची मागणी थांबली असल्यामुळे लागवडीचा खर्च देखील निघत नाही. व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावात मागणी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे त्यामुळे शेतकऱ्याने उद्विग्न होत निर्णय घेतला आहे.शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून कोरोणा अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. 
 
मी तीन एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. यंदा शेतीदेखील चांगली बहरली होती. मात्र कोरोनामुळे होत्याचे नव्हते झाले, संचारबंदी सुरू असल्याने कांद्याची निर्यात होऊ शकली नाही. शेतातील एक किलो देखील कांदा विक्रीला गेलेली नाही. सरासरी एकरी एक लाखाचे नुकसान झाले आहे. नाइलाजाने गावातील नागरिकांना शेतातून कांदा उपटून घेऊऩ जाण्याचे आवाहन केले आहे. 
- अनिल भिला पाटील, कांदा उत्पादक शेतकरी,कहाटूळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 317 अंकांनी वाढला; ऑटो-फार्मामध्ये खरेदी, कोणते शेअर्स तेजीत?

'आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा अतरंगी टिझर प्रदर्शित; प्रदर्शनाची तारीखही समोर

Sangli Children : चौदा महिन्यांचा श्रवण व अडीच वर्षांचा करण खेळताना पाण्याच्या टाकीत डोकावले अन्..., आई घरकामात व्यस्त घडलं भयानक

चाहत्याच्या वागण्यामुळे राजामौली संतापले!

Heatwave Survey : ‘हिवताप’ सर्वेक्षण सातारा जिल्ह्यात गतिमान; डेंगीचे ५९, मलेरियाचे ३९, तर चिकनगुनियाचे १७ रुग्‍ण आढळले

SCROLL FOR NEXT