Rain 
उत्तर महाराष्ट्र

महाराष्ट्रात नंदुरबार जिल्‍ह्यात सर्वांत कमी पाऊस

Nandurbar Rain News : नंदुरबार जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे येथील शेतकरी आजही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

निलेश पाटील


शनिमांडळ : राज्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सर्वदूर पडलेल्या पावसामुळे (Rain) सहा जिल्ह्यांत अतिवृष्टी, तर १५ जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy rain) झाला. १६ जिल्ह्यांत साधारण पाऊस पडला असून, केवळ नंदुरबार जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजेच उणे ४४ टक्के पाऊस झाला आहे. एकूणच राज्यात पावसाची स्थिती समाधानकारक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

(nandurbar district has the lowest rainfall in maharashtra)

या वर्षी बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या असमान पट्ट्यामुळे राज्यात कमी-जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाचे प्रमाण वाढले. त्यात महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेली द्रोनियस्थिती पोषक होती. त्यामुळे राज्यात २१ ते २६ जुलैदरम्यान सरासरी पाऊस झाला.

शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

कोकणात अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधारेने हजेरी लावली. मात्र, नंदुरबार जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे येथील शेतकरी आजही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.


राज्यातील पावसाची टक्‍केवारी अशी
-अतिवृष्टी झालेले जिल्हे ः परभणी- ८७ टक्‍के, सातारा- ६७, जालना- ६५, सोलापूर- ६१, रत्नागिरी- ६०, मुंबई- ६५ टक्के.
-मुसळधार पाऊस झालेले जिल्हे ः बीड- ५३ टक्‍के, सिंधुदुर्ग- ४७, कोल्हापूर- ४४, नांदेड- ४४, सांगली- ३८, रायगड- ४१, ठाणे- ३४, पुणे- २९, -उस्मानाबाद- ३४, लातूर- ३०, नगर- २४, वाशिम- २२, चंद्रपूर- २८ टक्‍के.
-साधारण पाऊस पडलेले जिल्हे ः पालघर- १८ टक्के, नाशिक- १८, औरंगाबाद- १५, हिंगोली- १३, यवतमाळ- १९, वर्धा- ११, नागपूर- १२, गडचिरोली उणे आठ, धुळे उणे १९, जळगाव, बुलढाणा व अमरावती उणे ९ टक्‍के, अकोला उणे ३ टक्‍के, गोंदिया उणे १७ टक्‍के.
-सर्वांत कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यात केवळ उणे ४४ टक्के पाऊस झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT