उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू

नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावून लसीकरण करून घ्यावे.

सकाळ वृत्तसेवा


नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील ४५ वर्षावरील लसीकरण ( corona vaccine) सुरू असून पून्हा जिल्ह्यात 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण (vaccination) सुरू झाले आहे. त्यासाठी 15 केंद्रांवर (vaccination center) सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे. (nandurbar district vaccination start citizens above eighteen years)

पूर्वीप्रमाणेच 30 वर्षावरील आणि 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण नियोजित केंद्रावर सुरू रहाणार आहे. 18 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात लसीचा पुरेशा प्रमाणात साठा आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावून लसीकरण करून घ्यावे. लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

अक्कलुवा ग्रामीण रुग्णालयात दररोज 150 (कंसातील आकडेवारी क्रमश: ऑनलाईन नोंदणी आणि ऑनस्पॉट लसीकरणाची आहे. 50,100), धडगाव ग्रामीण रुग्णालय 160 (10, 150), झापी प्रा.आरोग्य केंद्र 150 (50, 100), चुलावद प्रा.आरोग्य केंद्र 200 (50, 150), तळोदा ग्रामीण रुग्णालय 200 (100, 100), नवापूर ग्रामीण रुग्णालय 200 (100, 100), चिंचपाडा प्रा.आरोग्य केंद्र 200 (50, 150), शहादा नागरी आरोग्य केंद्र 200 (100, 100), प्रकाशा प्रा.आरोग्य केंद्र 200 (100, 100), कुसुमवाडा प्रा.आरोग्य केंद्र 150 (50, 100), वाघर्दे प्रा.आरोग्य केंद्र 200 (100, 100), जिल्हा शासकीय रुग्णालय नंदुरबार 200 (100, 100), जयप्रकाश नारायण नागरी आरोग्य केंद्र नंदुरबार 200 (100, 100), माळीवाडा नागरी आरोग्य केंद्र नंदुरबार 200 (100, 100) आणि तोरणमाळ ग्रामीण रुग्णालय येथे दररोज 150 नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा..

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT