bribe  
उत्तर महाराष्ट्र

डॉक्‍टराने घेतली लाच; तीही एसटी चालकाकडून

धनराज माळी

नंदुरबार : एसटी महामंडळातील चालकाच्या वैद्यकीय बिलाच्या फायलीमधील त्रुटी दूर करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना एस.टी. महामंडळाने नियुक्त केलेल्या कंत्राटी डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 
नंदुरबार एसटी आगारातील एका ५५ वर्षीय चालकास हृदयविकाराचा त्रास आहे. यापूर्वी त्यांना ॲटॅक आलेला आहे. त्यांची अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी झालेली आहे. 

त्रुटी दूर करण्यासाठी
चालकाला पचाराचा एकूण खर्च तीन लाखांच्या आसपास झालेला असून, हे बिल मंजूर होण्यासाठी त्यांनी एस.टी. महामंडळाने नियुक्त केलेले गाझीनगर, नंदुरबार येथे दवाखाना असलेले डॉ. मोजम अली खान यांच्याकडे गेल्या मे महिन्यात पडताळणीसाठी फाइल सादर केली होती. नंतर ती फाइल धुळे विभागीय कार्यालयात पाठविली असता, ती त्रुटींमुळे परत आली. त्रुटींची पूर्तता करून तक्रारदारांनी सप्टेंबरमध्ये फाइल डॉ. खान यांच्याकडे दिली, परंतु लाच दिल्याशिवाय ते त्रुटींची पूर्तता करत नव्हते. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नंदुरबार कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने गेल्या २९ ऑक्टोबरला पडताळणी केली असता, डॉ. खान यांनी पंचांसमक्ष चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून स्वत:च्या दवाखान्यात पंचांसमक्ष ही रक्कम स्वीकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT