उत्तर महाराष्ट्र

गाव, पाडे पुन्हा गजबजू लागली 

योगीराज ईशी

 कळंबू  ः गेल्या पाच- सहा महिन्यांपासून रोजगारानिमित्त विविध ठिकाणी स्थलांतरित झालेले आदिवासी मजूर आता गावाकडे परतू लागले आहेत. या मुळे ओस पडलेले पाडे, वस्त्या पुन्हा गजबजू लागल्या आहेत. 


दसरा, दिवाळीनंतर ग्रामीण भागातील बहुतेक मजूर रोजगारानिमित्त गुजरात व सौराष्ट्रसह परराज्यात उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह स्थलांतर करतात. या मुळे बहुतेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. शहादा तालुक्यातील गाव व पाडे ओस पडले होते. या मुळे स्थानिक व्यावसायिकांना याचा फटका सहन करावा लागला. मात्र, आठ ते १५ दिवसांपासून स्थलांतरित कुटुंबे गावाकडे येण्यास सुरवात झाल्याने गावे, पाडे पुन्हा गजबजू लागले आहेत. या मुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

घरवापसी झालेली कुटुंबातील मुले शाळेत जातील. या मुळे विद्यार्थिसंख्याही वाढणार आहे. दरम्यान, धडगाव तालुक्यातील बहुतांश मजूर शहादा, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील विविध गावांत रोजगारानिमित्त स्थायिक झाले आहेत. सध्या गहू, हरभरा, दादर कापणी जोरावर सुरू आहे. शेतकऱ्यांना मजूर मिळाल्याने पीक काढणीस वेग आला आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT