malnourished children
malnourished children sakal
उत्तर महाराष्ट्र

कुपोषित बालकांत अडीच हजाराची वाढ; भितीपोटी उपचाराकडे पाठ

सकाळ डिजिटल टीम

चिचपाडा (नंदुरबार) : राज्यात वाढते कोरोनामुळे (Coronavirus) नंदुरबार जिल्ह्यातील (malnourished children nandurbar district) सातपुडा अतिदुर्गम भागातील कुपोषणाकडे प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष झाले असून गतवर्षाच्या तुलनेत अडीचहजार बालकांच्या कुपोषणात वाढ झाली आहे. कोरोनाच्या भीतीपोटी आदिवासी पालक आपल्या मुलांना पोषण पुर्नवसन केंद्रात (Nutrition Rehabilitation Center) उपचारासाठी दाखल करण्यास घाबरत आहेत. पावसाळ्यात कुपोषणाची स्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. (nandurbar-increase-two-and-half-thousand-malnourished-children-in-corona-period)

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील बालकांच्या कुपोषणावर ठोस उपाययोजना नसली तरी आटोक्यात आणण्यासाठी शासन -प्रशासन प्रयत्नशील आहे. मोलगी येथे कुपोषित बालकांच्या पोषणसाठी स्वतंत्र पोषण पुर्नवसन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे बऱ्यापैकी फायदा यापरिसरातील कुपोषित बालकांना झाला. मात्र कोरोना संसर्गामुळे कुपोषणाची स्थिती आणखीन गंभीर होतांनाचे चित्र सध्या पुढे येत आहे.

९ हजारावर कुपोषित बालके

एप्रिल २०२० च्या तुलनेत तब्बल अडीच हजारावर कुपोषीतांचा आकडा वाढला असून एप्रिल अखेरीस ९ हजार ४२१ बालके कुपोषीत आहेत. त्यातील ८ हजार ९२१ बालके ही मॅम श्रेणीतील, तर ९०८ बालक ही सॅम म्हणजे तीव्र स्वरुपातल्या कुपोषीत श्रेणीतील आहे. मागच्या एप्रिल मध्ये कपोषींताचा हाच आकडा ६ हजार ९२१ इतका होता. त्यामुळेच वर्षभरात कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या भितीने बालकांना आणणे टाळले

तीव्र कुपोषीत बालकांच्या पोषण आणि उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या पोषण पुर्नवसन केंद्राकडे आदिवासी पालकांनी पाठ फिरविली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे पालक बालकांना घेवुन येण्याचे टाळत आहेत. त्यामुळे पोषण पुर्नसवसन केंद्र चक्क ओस पडली आहेत. अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातील पोषण पुर्नवस केंद्रात एकही बालक दाखल नसल्याचे चित्र आहे. दुर्गम भागातील, मोलगी, धडगाव, तळोदा येथील पोषण पुर्नवसन केंद्राची अवस्था काही वेगळी नाही, याठिकाणचे पोषण पुर्नवसन केंद्रात देखील कुपोषीत बालकांची उपचारासाठी प्रतिक्षा कायमच आहे. त्यामुळे यातील अनेक केंद्रात जिल्हा प्रशासनाने लसीकरण कॅम्प सुरु केले आहे. यात अक्कलकुवा आणि धडगाव पोषण पुर्नवसन केंद्राचा समावेश आहे.

कुपोषित बालके व पोषण पुनर्वसन केंद्रांतील संख्या अशी

तालुका…२०२० दाखल…...२०२१ दाखल

नंदुरबार…... १८०...…….. ०३

मोलगी……. १७७...……. ००

धडगाव…... १५९...…….. ००

तळोदा…….. ६८...……...००

अक्कलकुवा...९९...…….. ००

एकूण…….. ६८३...…….. ०३

पालक बालकांसह येण्यास घाबरत असल्याने गाव पातळीवर ७४८ व्हीसीटीसीच्या माध्यमातुन ११४४ बालकांवर घरीच उपचार सुरू आहे. एखाद्या बालकाची तीव्र कुपोषणाकडे वाटचाल झाल्यास त्याला तात्काळ दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

- कृष्णा राठोड, महिला बालविकास अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT