Trees Broke Trees Broke
उत्तर महाराष्ट्र

साठ आरोपी निष्पन्न आणि सतराशे झाडांची कत्तल!

Nandurbar Forest News: शहादा तालुक्यातील लंगडी भवानी वनक्षेत्रात १८ जुलैला शेकडो लोकांच्या जमावाने अमानुषपणे झाडांची कत्तल करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ डिजिटल टीम


मंदाणे : शहादा तालुक्यातील लंगडी भवानी वनक्षेत्रात (Langadi Bhavani forest area) शेकडो झाडांची अमानुषपणे कत्तल (Trees Broke)केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शहाणे येथील सात जणांना न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील अजून ६० आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, त्यांनाही लवकरच अटक होणार असल्याचे वन विभागाच्या (Nandurbar Forest Department) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, कत्तल झालेल्या झाडांची मोजणी पूर्ण झाली असून, एकूण एक हजार सातशे झाडांची कत्तल झाली आहे. त्यांची किंमत साडेतीन ते चार लाखांपर्यंत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
(nandurbar langadi bhavani forest area trees brokan case sixty suspicious)

शहादा तालुक्यातील लंगडी भवानी वनक्षेत्रात १८ जुलैला शेकडो लोकांच्या जमावाने अमानुषपणे झाडांची कत्तल करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. घटनेचा पंचनामा करून एक हजार सातशे झाडांची कत्तल झाली असून, त्यांची किंमत साडेतीन ते चार लाखांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. संशयित पदम सुळे, सीताराम भिल, महेंद्र पावरा, मनोज डुडवे, मच्छिंद्र सुळे, जयराम पावरा, सुनील तडवी (सर्व रा. शहाणे) यांचा झाडांच्या कत्तलीत समावेश असल्याच्या आरोपावरून त्यांची न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणी आरोपींची संख्या मोठी असून, अटकेत असलेल्या आरोपींची चौकशी केल्याने तब्बल साठ जणांची नावे मिळाली असून, त्यांना लवकरात लवकर अटकेसाठी स्वतंत्र पथके रवाना झाली आहेत.

जमावाचा वन कार्यालयावर ठिय्या
दरम्यान, अटक केलेल्या आरोपींची सुटका होण्यासाठी गुरुवारी (ता.२९) संध्याकाळी त्यांच्या नातेवाइकांसह संतप्त जमावाने मोठ्या संख्येने वन विभागाच्या दोंडाईचा रस्त्यावरील विभागीय कार्यालयाजवळ ठिय्या मांडला. वनविभागाचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर, साहाय्यक उपवनसंरक्षक धनंजय पवार, गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल शिवाजी रत्नपारखी, शहादा वनक्षेत्रपाल एस. के. खुने, प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत आदींनी जमावाची समजूत काढत या घटनेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, इतर कोणत्याही निरपराध लोकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. कायदेशीर प्रक्रिया करण्याचे काम करू द्या, असे सांगितले. तरीही जमाव परत जायला तयार नसल्याने अखेर पोलिस कुमक मागवत जमाव पांगविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT