उत्तर महाराष्ट्र

‘बागेतील शाळा’ उपक्रम अंतर्गत बागेत भरतेय शाळा !

जिजाबराव बागुल

खापर ः हल्ली कोरोनामुळे लॉकडाउन सुरू असल्याने सरकारी आदेशाने शिक्षक वर्ग विद्यार्थांना ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने शिकवत आहेत. खापर केंद्रातील जिल्‍हा परिषद शाळा उदेपूर (खालचे) ता. अक्कलकुवा येथील मुख्याध्यापक मोगीलाल चौधरी व त्यांचे सहकारी जोलंमा वसावे यांनी शाळेतच ‘बागेतील शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे. आठवड्यातून दोन दिवस शिक्षक हा नवोपक्रम राबवत असल्याने विद्यार्थी आनंदाने सहभागी होत आहेत. 

ऑनलाइन अध्यापन करताना अक्कलकुवा सारख्या दुर्गम तालुक्यात अनेक अडचणी आहेत, या गावातील सामान्य आदिवासी समाज बांधवांकडे स्मार्टफोन नाहीत, तशातच ज्या दोन-चार पालकांकडे स्मार्टफोन आहेत त्यांच्याकडे बॅलन्स नसतो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे येथे मोबाईल नेटवर्क नसते अशा अनेक अडचणी आहेत, अश्या वेळी व्हाट्सपवर किंवा ऑनलाइन अध्यापन करताना शिक्षकांना व विद्यार्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून या उपक्रमशील शिक्षकांनी गावातील परिस्थिती तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याची खात्री करून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम सुरू केले आहे. 

शासन नियमांचे पालन 
सर्व विद्यार्थ्यांचे सॅनिटाइझरने हात स्वच्छ धुऊन मास्क दिले जातात व एकमेकांपासून लांब बसवून अध्यापन केले जाते, कुणी आजारी नाही, याची खात्री केली जाते, उघड्यावर मोकळ्या जागेत वर्ग भरवल्याने वातावरणात ताजेपणा व विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात शाळेच्या आवारात झाडाखाली शिक्षण देताना शिक्षणात उत्साह वाढत असल्याचे मत या शिक्षकांनी व्यक्त केले. 

शाळा बंद शिक्षण सुरू 
विद्यार्थ्यांना एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवण्याबाबत विशेष दक्षता घेऊन आठवड्यातून दोन दिवस २ तास अध्यापन केले जाते. शासन सर्वत्र शाळा सुरू करण्याबाबत आदेश देत नाही, परंतु ऑनलाइन पद्धतीने अध्यापन करावे याबाबत मार्गदर्शक सूचना आहेत, शाळा बंद आहे परंतु विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. शाळा कधी सुरू होतील याबाबत निश्चित सांगता येत नाही अश्या प्रकारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून परिस्थितीचा अंदाज घेऊन उदेपूर (खा)येथे बागेतील शाळा उपक्रम सुरू आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

योग गुरूचा १७ वर्षीय मुलीसह ८ महिलांवर अत्याचार, अल्पवयीन पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस

Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत

Girish Mahajan : ठाकरे ब्रॅन्ड नामशेष झाला, आगामी निवडणुकीत बॅन्ड वाजणार; गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

Pimpri News : नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत अप्पर तहसीलमध्ये सेवांचा पुरवठा सुरूच

SCROLL FOR NEXT