उत्तर महाराष्ट्र

टाळेबंदीमुळे सामान्य माणसाचे कोलमडले आर्थिक गणित 

संजय मिस्तरी

वडाळी : १ एप्रिलपासून जिल्ह्यात टाळेबंदी होत असल्याने अनेकांनी खरेदीचा सपाटा सुरू केला आहे. मात्र दैनंदिन लागणारा किराणा माल व भाजीपाल्याच्या किमतीत अचानक वाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. एकीकडे कोरोना पिच्छा सोडायला तयार नाही, तर दुसरीकडे महागाई कमी व्हायला तयार नाही. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे आर्थिक गणित चुकत आहे. 


नंदुरबार जिल्ह्यात १ ते १५ एप्रिलपर्यंत टाळेबंदचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या वर्षी झालेल्या टाळेबंदीच्या काळातही अनेक वस्तूंच्या किमती दुप्पट, चौपट झाल्या होत्या. नाइलाजाने त्यांची खरेदी करावीच लागते. या मुळे अनेकांचे आर्थिक गणितच कोलमडून काहींनी मनस्ताप करून आत्महत्याही केल्या. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना गावागावांतून बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या मुळे अनेकांनी स्वयंस्फूर्तीने व्यापार व्यवसाय बंद केल्यामुळे अनेक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. त्यातच दैनंदिन लागणारा किराणा माल व भाजीपाला यांच्या किमतीही वाढल्याने अधिकची रक्कम मोजून वस्तू घ्याव्या लागत आहेत. मात्र असाच काळ पुढे राहिला तर हातमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, असेही बोलले जात आहे. 


महागाईवर सगळ्यांनी गिळले मूग 
सामान्यांसह सर्वांनाच लागणाऱ्या किराणा वस्तूत खाद्यतेलासह डाळी यांच्या किमतीत भरमसाट वाढ होत आहे. मजुराला प्रत्येक दिवशी काम राहील, असे नसल्याने अनेकजण हात उसनवारी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत. मात्र दररोज वाढणाऱ्या महागाईबद्दल कुणीच चकार शब्द बोलायला तयार नाही. उलट आंतरराष्ट्रीय पातळीचे बजेट व घडामोडीचे वर्णन सामान्यांना शिकवले जाते. स्थानिक पातळीवर पुरेशा प्रमाणात रोजगार नसल्याने हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना या महागाईची झळ सोसावी लागत आहे. कोरोनाबाधित झालेल्या अनेक कुटुंबीयांचे उद्योग, व्यवसाय बंद झाले. या मुळे कुटुंबाचा चरितार्थ चालवावा कसा, असा प्रश्न उभा आहे. याबाबत जिल्ह्यातील जबाबदार लोकप्रतिनिधींनी टाळेबंदीच्या काळात महागाईवर नियंत्रण करावे, अशी मागणी होत आहे. 

कोरोनाचा उद्रेक होत असल्यामुळे अनेक गावे सीमाबंद आहेत. भाजीपाला मार्केटमधून खरेदी केला जातो. परंतु तो गावातून मार्केटला जात नसल्यामुळे आहे तेवढाच भाजीपाला दुप्पट भावाने खरेदी करावा लागतो म्हणून दराबाबत चढ-उतार सुरूच असतो. 
-गोरख माळी, भाजीपाला व्यावसायिक, वडाळी 

सध्या खाद्यतेलासह डाळ, साखर यांच्या किमतीत अचानक वाढ होत आहे. रोजंदारी नित्य राहत नाही. त्यामुळे अशा दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीबाबत नियंत्रण होणे गरजेचे आहे. 
-रजेसिंग भिल, मजूर कोंढावळ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : “निःपक्षपातीपणे अन् न्याय्य पद्धतीने काम करा, न्यायालयाचा भार वाढवू नका”; निवडणूक आयोगाला हायकोर्टाने फटकारलं

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Maharashtra Drought Subcommittee : बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना नऊ मंत्र्यांसह मुख्य सचिवांचा समावेश

Maharashtra Ganesh Visarjan Live: पारंपरिक पद्धतीने तांबडी जोगेश्वरी गणपतीची भव्य मिरवणूक, विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT