nandurbar asha worker
nandurbar asha worker sakal
उत्तर महाराष्ट्र

आशा, गट प्रवर्तक उद्यापासून राज्यव्यापी संपावर

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक संघटना राज्‍यव्यापी संपावर जात आहेत. याबाबत उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर (महसूल)यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. (nandurbar-Maharashtra-State-Asha-Group-Promoter-Employees-strike)

महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्यावतीने राज्यभरातील ६४ हजार आशा स्वयंसेविका व ४ हजार गटप्रवर्तक संपावर जात असल्याच्या संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करून सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम हाती घेतली. यामध्ये आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी जबाबदारीने आपले काम पार पाडले, परंतु शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने बेमुदत संपावर जात असल्याचे संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आशा व गतप्रवर्तक संघटना राज्य उपाध्यक्ष वैशाली खंदारे, रत्ना नंदन, मंदाकिनी पाटील, संगीता बिरारी, कल्पना चौधरी, दीपाली पाटील, कमीता गावित, यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

अशा आहेत मागण्या

- आरोग्यसेविका पद भरतीमध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना ५० टक्के आरक्षण मिळावे, आशा स्वयंसेविका ना योजनाबाह्य काम सांगण्यात येऊन नये, मोबदला शिवाय कोणतेही काम करून घेऊ नये, प्रेरणा प्रकल्पाच्या रिपोर्टिंगसाठी दर सहामाही १५०० रुपये मोबदला मिळावा, दरमहा मानधन जमा करताना मोबदला हिशोब पावती देण्यात यावी, थकित मानधन त्वरित देण्यात यावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत येण्यापूर्वी आशा स्वयंसेविकांना मानधन दुप्पट करण्याचे दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT