raksha bandhan
raksha bandhan 
उत्तर महाराष्ट्र

अतुट नात्‍याच्या धाग्‍याला कोरोनाची नजर...लाखोची उलाढाल आली हजारावर 

धनराज माळी

नंदुरबार : रक्षाबंधनानिमित्त आज रविवार असूनही बाजारपेठेत महिला व युवतींची राख्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. अनेक जण कोरोनामुळे रक्षाबंधनास जाणे टाळणार असले तरी गावात नात्याचे बंधू असलेल्यांना या भगिनी राखी बांधून रक्षाबंधन आहेत तेथेच साजरे करणार असल्याने राख्या खरेदीसाठी गर्दी दिसून आली. दरम्यान, यंदा मात्र राख्या विक्रीचा व्यवसायाला कोरोनाचा खूपच फटका बसला आहे. 
कोरोना महामारीने कहर केला आहे. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या रूग्ण संख्येमुळे लॉक -अनलॉकचा खेळ सुरूच आहे. रक्षाबंधन एक दिवसावर आले तेव्हा आज अनलॉक झाले. गेल्या आठ दिवसापासून लॉकडाऊन होते. त्यामुळे रक्षाबंधनासाठी शहरात राख्या विक्रीतून होणारी लाखोची उलाढाल यंदा हजारावर आली आहे. अनेक सिजनेबल व्यावसायिकांनी लॉकडाऊनमुळे राख्या विक्रीसाठी दुकाने थाटता आले नाही. आज एक दिवस मिळाला. तोही संचारबंदीचा दिवस होता. मात्र सणाचा पार्श्वभूमीवर खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज बाजारपेठ सुरू ठेवण्यास मुभा दिली. त्यामुळे एक दिवसात जेवढ्या राख्या विक्री होतील, तेवढ्या विक्रीसाठी आज बाजारपेठेत विक्रेत्यांनी दुकाने थाटले होते. त्यामुळे आज महिला व युवतींनी राख्या खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यातही ४० ते १०० रूपये डझनाच्या दरातील राख्यांना मागणी होती. दरवर्षी असणाऱ्या विविध प्रकारातील आकर्षक व महागड्या राख्यांना कोणीही विचारले नाही. 

आहेत तेथेच महिलांचे रक्षाबंधन 
रक्षा बंधन हा भाऊ-बहीणीचा पवित्र बंधनाचा सण असतो. त्यामुळे रक्षाबंधनाला बहीण भावाकडे येते. किंवा भाऊच बहिणीकडे जाऊन राखी बांधून भाऊ-बहीणीचा पवित्र नात्याचा ऋणानुबंध घट्ट करतात. मात्र कोरोनामुळे कोणीही घरा बाहेर न जाण्याचे प्रशासनाने केलेले आवाहन व प्रवासासाठीचे वाहने बंद असल्याने ना बहीण भावाकडे जाणार आहे. नाही भाऊ बहिणीकडे येणार असे चित्र आहे. गावालगत जवळपास किंवा जिल्हा अंतर्गत गावे असल्यास मोटारसायकलीने जाऊन रक्षाबंधन साजरी करण्याचा काहींचा विचार आहे. तर काहीजण जिल्ह्यातंर्गत असूनही कोरोनाच्या भीतीने जाणे टाळणार आहेत. 

सोशियल मिडीयावरून शुभेच्छा 
अनेक बंधू-भगिनींनी प्रत्यक्ष भेटीपेक्षाही सोशल मिडियावरूनच आजपासूनच एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात अनेकांनी मागील रक्षाबंधनाचे फोटो व्हॉटसॲप, फेसबुकवर प्रसिद्ध करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.तर काहींना मोबाईलवर संभाषण करून भाऊने बहिणीची राखी मिळाल्यासारखे असल्याचे सांगत आपल्या पवित्र नात्याचे दर्शन घडविले आहे. 


संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT