nandurbar medical collage 
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार वैद्यकिय महाविद्यालयात पद निर्मितीस मान्यता

धनराज माळी

नंदुरबार : नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास यंदा प्रारंभ होत असून शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संदर्भातील बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि आदिवासी विकास विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

निधीही झाला मंजूर
वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले, की शंभर विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मंजुरी दिली आहे. २१ जानेवारी २०१२ ला नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास परवानगी मिळाली. केंद्राचे ६० टक्के (१९५ कोटी), राज्य शासनाचे ४० टक्के (१३० कोटी) निधी मंजूर झाला आहे. नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी वर्ग १ ते वर्ग ४ संवर्गात पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले. 

महाविद्यालय उभारणीस गती
आदिवासी विकास मंत्री ॲड. पाडवी म्हणाले, की नंदुरबार जिल्ह्यासाठी महत्‍त्वाकांक्षी असलेल्या नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ४१.०९ एकर जागेत उभारण्यात येणार असून येणाऱ्या काळात महाविद्यालयाच्या कामाबरोबरच रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे निर्देश ॲड. पाडवी यांनी दिले. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT