molagi rural hospital
molagi rural hospital 
उत्तर महाराष्ट्र

या रूग्णालयात नाही वीज अन्‌ लसही खराब 

सकाळ वृत्तसेवा

मोलगी : येथील ग्रामीण रुग्णालयात खंडित वीजपुरवठ्यामुळे विविध अडचणी येत असून अनेक महत्वपूर्ण लस फ्रिजरमध्ये असूनही फ्रीज सुरू नसल्याने त्या खबरा होत असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण रुग्णालयात अनेक रिक्तपदे शासनाने अद्याप न भरल्यामुळे रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड होते. 

मोलगी हे ८५ गावे व पाडे जोडून येणारे बाजारपेठेचे सर्वात मोठे गाव असून या ठिकाणी परिसरातील गाव पाड्यातील जनता येत असतात. शासन ग्रामीण भागातील कार्यक्षेत्रात रिक्त असणारी पदे भरण्यास तयार नाही. अपूर्ण कर्मचारी संख्यामुळे तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांना जास्तीची कामे करावी लागतात. सातपुड्यातील कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कुपोषण मुक्त जिल्हा करण्यासाठी शासनाने सर्व सोयींयुक्त असे ग्रामीण रुग्णालय उभारले, मात्र या ग्रामीण रुग्णालयात शासकिय नियमानुसार एकुण सात वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे असून सध्या फक्त तीनच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. 
या ठिकाणी एकुण सात वैद्यकीय अधिकारी बालरोगतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ असे एकुण चार एमबीबीएस वैद्यकिय अधिकाऱ्यांची गरज असून सध्या परिचारिका चार आहेत. त्यापैकी तीन कायम असून चार पदे रिक्त आहेत. शिपाई पदही रिक्त असून तात्पुरत्या मानधनावर काम करणारे कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती शासनाने केल्यास येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण उत्कृष्ट व चांगल्या प्रकारची सेवा मिळू शकेल. 
मोलगी परिसर भौगोलिक दृष्टीकोनातून डोंगराळ असून गाव, पाड्याची विखुरलेली वस्ती आहे. नर्मदा नदी किनाऱ्यावरील कंजाला, मांडवा, मुखडी, डनेल, सिंदूरी, गमण, मणिबेली आदी गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. या गावातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर मोलगी येथे उपचारासाठी येतात. या परिसरात नियमीत वीजपुरवठा असणे गरजेचे आहे. 
नर्मदा नदीच्या काठावरील अतिदुर्गम गाव पाड्यात नागरिकांना हिंस्त्रप्राण्यांचा धोका मोठा आहे. त्यात सर्पदंश, कुत्रा चावणे आदी प्रश्‍न आहेत, त्यामुळे रूग्णांना वेळेवर लस मिळणे आवश्‍यक असताना त्या मिळत नसल्याने गैरसोय होत आहे. 
 
लॅब असिस्टंट पद रिक्त 
रूग्णालयात रिक्त पदांमध्ये लॅब असिस्टंटचे पदेही अनेक दिवसांपासून रिक्त आहे. कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांची कामे रखडल्याने त्यांना इतरत्र राहावे लागत आहे. रूग्णालयात पाण्याची मोठी समस्या आहे. औषधनिर्माताही पुर्णवेळ नसल्याने आदिवासी जनतेला औषधांसाठी थांबून राहावे लागते. औषधांचा पुरवठाही वेळेवर होत नसल्याने रूग्णांना बऱ्याचदा बाहेरून औषधे आणावी लागतात. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराट आऊट, पण फाफ डू प्लेसिसचा चेन्नईला अर्धशतकी दणका

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT