ATS squad 
उत्तर महाराष्ट्र

गुजरातच्या मोस्ट वॉंटेडला नवापूरमधून अटक; सुरत एटीएसची कारवाई

सुरत पोलिसांनी अटक केली होती. २००५ ते २०१० दरम्यान सुरत येथील हसमुख लालवाला यांच्यावर फायरिंग केसमध्ये सात वर्षे शिक्षा झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा


नवापूर : सुरत (Surat) शहरातील गुजसीटोक गुन्ह्यातील संशयिताला सुरत एटीएसच्या पथकाने (ATS squad)रविवारी रात्री अटक केली. याबाबत स्थानिक पोलिस अनभिज्ञ होते. गुजरात (Gujarat) राज्याचा मोस्ट वॉंटेड संशयित मोहंमद अशरफ नागोरी सहा-सात महिन्यांपासून नवापूर (Navapur) शहरात वास्तव्यास होता.


सुरत शहरातील लालगेट पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित मोहंमद अशरफ नागोरी (रा. रामपुरा पस्तागिया शेरी, लालगेट, सुरत) सुरत येथून पळून जाऊन पश्चिम बंगालमध्ये खोट्या नावाने राहत होता. पांढरे केस व दाढी काळी करून जीन्स पॅन्ट असा वेश परिधान करून तो वावरत होता. पश्चिम बंगाल येथून दोन-तीन महिन्यानंतर नवापूर येथे आला होता. तो नऊ महिन्यांपासून पळत फिरत होता. त्याच्या तपासासाठी एटीएसचे पोलिस निरीक्षक सी. आर. जाधव यांची नेमणूक झाली होती. श्री. जाधव यांना मोहंमद अशरफ नागोरी नवापूर शहरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून गुजरात एटीएस पथकाने तो लपून बसलेल्या जागेवर छापा टाकला. गुजरात एटीएसच्या टेक्निकल तथा ह्यूमन सर्वेलन्स आधारे संशयिताला अटक केली. मोहंमद अशरफ नागोरी याच्याविरोधात २४ गुन्हे दाखल आहेत. नागोरीला तपासासाठी अहमदाबादला नेले असून, तपास पूर्ण झाल्यावर सुरत पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.


दरम्यान, मोहंमद अशरफ नागोरी याला २००३ मध्ये सुरत व अहमदाबादमध्ये पोटांतर्गत अटक झाली होती. २०१३ ते २०१५ मध्ये पासांतर्गत सुरत पोलिसांनी अटक केली होती. २००५ ते २०१० दरम्यान सुरत येथील हसमुख लालवाला यांच्यावर फायरिंग केसमध्ये सात वर्षे शिक्षा झाली आहे. २००३ मध्ये जेहादी गुन्ह्यात पोटांतर्गत अटक झाली असून, या गुन्ह्यात ५४ संशयितांना पकडले होते. नागोरीला जेहाद कावतरा आणि ११ पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक झाली आहे. सुरत पोलिसांनी त्याला २०१९ व २०२० मध्ये तडीपार केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT