Navapur Small Dam 
उत्तर महाराष्ट्र

बंधाऱ्यावरील फळ्या न काढल्याने नवापुरातील काही गावांना धोका

Nandurbar Dam News: नवापूर तालुक्यातील रायंगण, रंगावली, नेसू व सरफणी या प्रमुख नद्या आहेत. या नदीवर सिंचनासाठी पाटबंधारे विभागामार्फत बंधारे बांधले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवापूर : तालुक्यातील लघु बंधाऱ्यांवरील (Small Dam) फळ्या (Boards) न काढल्याने मोठा पाऊस (Heavy rain) आल्यास शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना (Farmers and Villagers) धोका (Danger) निर्माण होऊ शकतो. शेतातील पिकांसोबत घरे, जनावरेही वाहून जात मोठी जीवितहानी होऊ शकते. मात्र याबाबत संबंधित पाटबंधारे विभागाला काही देणंघेणं दिसत नाही. जुलै महिना संपत आला तरी फळ्या काढण्यास पाटबंधारे विभागाला ( Department of Irrigation) मुहूर्त मिळत नाही.

(navapur taluka small dam boards not remove many village danger)


नवापूर तालुक्यातील रायंगण, रंगावली, नेसू व सरफणी या प्रमुख नद्या आहेत. या नदीवर सिंचनासाठी पाटबंधारे विभागामार्फत बंधारे बांधले आहेत. उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी या लघु बंधाऱ्यांवर लोखंडी फळ्या टाकून पाणी अडविले जाते. मात्र पावसाळा सुरू होऊन आता जवळजवळ दोन महिने होत आले तरीही लोखंडी फळ्या काढल्या नाहीत. हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जुलैअखेर व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाची तीव्रता वाढणार आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, तर बंधारे फुल होतील. परिणामी, बंधाराही फुटून आजूबाजूच्या शेताला व गावातील ग्रामस्थांना धोका निर्माण होऊ शकतो. अनेक घरे, शेती, पशुधन वाहून जाऊ शकते. बंधारा फुटल्याने मोठी जीवितहानी होऊ शकते. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने या फळ्या काढणे गरजेचे होते. परंतु तसे न करता विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे.

गावकऱ्यांना याचा धोका
नवापूर तालुक्यातील रायंगण नदीवर होलीपाडानजीक लघु बंधाऱ्यावरील फळ्या न काढल्याने मोठा पाऊस आल्यास शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना याचा धोका निर्माण होऊ शकतो. पीक, घरे, जनावरेदेखील यात वाहून जातील, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.


...तर मनुष्यवधाचा गुन्हा
याबाबत धुळे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश व्हट्टे यांना विचारणा केली असता, त्यांनी टेंडर टाकले आहे. टेंडर ओपन झाल्यावर ठेकेदाराकडून हे काम केले जाईल, असे सांगितले. यामुळे जुलै संपत आला तरी फळ्या काढण्याचा मुहूर्त पाटबंधारे विभागाला मिळेना. पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठी दुर्घटना घडल्यास संबंधित विभागास जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा स्थानिकांनी देत याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.


नवापूर तालुक्यातील रायंगण नदीवरील साठवण बंधाऱ्यावरील फळ्या पावसाळ्यापूर्वी काढणे गरजेचे होते. परंतु संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्षामुळे फळ्या न काढल्याने पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास अनेक गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत पाटबंधारे विभागाचे अभियंत्यांना फोनवर माहिती दिली, तरीही उपाययोजना केली नाही.
-तानाजीराव वळवी, सामाजिक कार्यकर्ते, पांघराण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT