covaccine covaccine
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा

नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यात आला असून नागरिकांना लसीच्या एक लाख (डोस) मात्रा देण्यात आल्या आहेत.

नंदुरबार जिल्‍ह्‍यात एकूण ११ हजार ७३८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा, तर ६ हजार ७०३ कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. कोरोना योद्ध्यांपैकी १४ हजार ३२७ व्यक्तींना पहिली, तर ६ हजार ३१६ व्यक्तींना दुसरी मात्रा देण्यात आली. ४५ ते ६० वयोगटातील व्यक्तींपैकी २५ हजार ३७ व्यक्तींना पहिली तर ३ हजार ३५५ ना दुसरी , तर ६० वर्षापेक्षा अधिक वयाच्या २८ हजार २८४ ज्येष्ठ नागरिकांना पहिली आणि ५ हजार २७२ ज्येष्ठ नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. एकूण ७९ हजार ३८६ व्यक्तींना लसींची पहिली मात्रा, तर २१ हजार ६४६ व्यक्तींना दुसरी मात्रा अशा एकूण १ लाख १ हजार ३२ चा टप्पा या लसीकरण मोहिमेने पूर्ण केला आहे.

ग्रामीण भागात दिला जाणार वेग

१४ हजार ३७२ मात्रा कोवॅक्सीनच्या तर ८६ हजार ६६० मात्रा केाविशिल्डच्या देण्यात आल्या. लसींच्या ५४ हजार ८१८ मात्रा पुरुषांना, तर ४६ हजार २१४ मात्रा महिलांना देण्यात आल्या. ग्रामीण भागात तसेच अधिक कोरोना बाधित आढळणाऱ्या भागात विशेष मोहीम राबवून लसीकरणाला वेग देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिकांचे सहकार्य घेण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी विशेष पथकांची स्थापना करून लसीकरणाला वेग देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT