उत्तर महाराष्ट्र

भयंकर : एकाच दिवशी स्मशानभूमीत कोरोनाच्या तब्बल.. 27 मृतदेहांवर अंत्यसंस्कार

शासन-प्रशासन कोरोना च्या उद्रेक थांबवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. आत्तापर्यंत अनेक उपाय योजना करण्यात आले

धनराज माळी

नंदुरबार : येथील स्मशानभूमीत आज सत्तावीस जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यात दोन कोरणा रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात सोडून निघून गेल्याने दोन दिवस प्रतीक्षा केल्यानंतर आज त्या दोन्ही रुग्णांवर बेवारस म्हणून नगरपालिकेने अंत्यसंस्कार केले आहेत.

शासन-प्रशासन कोरोना च्या उद्रेक थांबवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. आत्तापर्यंत अनेक उपाय योजना करण्यात आले. मात्र अद्याप प्रभावी ठरले नाही त्याउलट पहिल्या लाटे पेक्षा सध्याच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या वाढत आहे. ही संख्या डोळे भिरभिरवणारी आहे. कोणाचा घोळक्यात सापडलेले अनेक रुग्ण बरे होत असतानाच अनेक तरुणांनाही जीव गमवावा लागत आहे.

मृतांचा आकडा मोठा

एकीकडे जिल्हा रुग्णालय हाउसफुल झाले आहे तर दुसरीकडे खासगी रुग्णालयांमध्ये बेडच उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना लगतचा गुजरात राज्यातील सुरत येथे उपचारासाठी दाखल करीत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस धोरणाची परिस्थिती गंभीर बनत आहे आजच्या मृतांचा आकडा डोळे भिरभिरवणारा आहे. आज तब्बल 27 मृतदेहांवर नंदुरबार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले हे सर्व धोरणाचे बळी ठरलेले मृतदेह होते.

447 रुग्ण झाले बरे

कोविड-19 उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णांची तालुकानिहाय माहिती

14 एप्रिल 2021

नंदुरबार-266

शहादा-83

नवापूर-66

तळोदा-29

अक्कलकुवा-03

एकूण-447

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT