sarangkheda project
sarangkheda project 
उत्तर महाराष्ट्र

सारंगखेडा, प्रकाशा बॅरेजचे दोन दरवाजे उघडले

सकाळ डिजिटल टीम

प्रकाशा/सारंगखेडा (नंदुरबार) : पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजेसचे द्वार परिचालन करण्यात येत आहे. त्यासाठी गुरूवारी (ता. १७) सायंकाळी सहाला दोनही बॅरेजचे प्रत्येकी दोन गेट अर्धा-अर्धा मिटने उघडण्यात आले आहेत. (nandurbar-sarangkheda-and-prakasha-project-two-door-open)

हतनूर (जि.ज ळगाव) धरणातून १२ जूनला दुपारी एकला २३ हजार क्युसेक्स विसर्ग तापी नदीत सोडण्यात आला होता. त्यामुळे सतर्कतेच्या इशारा देण्यात आला होता. तो विसर्ग जिल्ह्यातील बॅरेजेस मध्ये गुरूवारी पोहोचला. सद्यःस्थितीत सुलवाडे बॅरेजचे २ दरवाजे अर्धा मिटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून ४ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

सारंगखेडा बॅरेजचेमधून ३२०० क्‍युसेक्‍स विसर्ग

त्यासोबतच वरिष्ठांचा आदेशानुसार गुरूवारी (ता.१७) पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा बॅरेजचे २ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून ३ हजार १९२ क्युसेक्स विसर्ग केला जात आहे. तर प्रकाशा बॅरेज चे २ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून ३ हजार ५४० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सद्या प्रकाशा बॅरेज मध्ये ६२ टक्के पाणीसाठा असून पाण्याची पातळी १०८.५० मीटर आहे. तर तापी काठावरील गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे.

गतवर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दोनही बॅरेजेसचे दरवाजे बंद करण्यात आले होते. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता दोन्ही बॅरेजेसची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठीद्वार परिचालन करण्यात येत आहे.

- मयूर परदेशी, शाखा अभियंता, पाटबंधारे उपविभाग, प्रकाशा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अभिनेते शेखर सुमन यांनी घेतली जेपी नड्डा यांची भेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT