उत्तर महाराष्ट्र

पहिली ते आठवीसाठी ऑनलाइन वर्ग ४५ मिनिटांचाच...

निलेश पाटील

शनिमांडळ :ऑनलाइन शिक्षण कसे दिले जावे,याबद्दल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून डिजिटल शिक्षणासंबंधी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.डिजिटल शिक्षण देताना स्क्रीन टाईम बाबत मार्गदर्शन देण्यात आले आहे. मानसिक,शारीरिक थकवा कसा दूर करता येईल याबाबत ही माहिती दिली आहे.यात पहिली ते आठवीसाठी ऑनलाइन वर्ग पंचेचाळीस मिनिटांचा करण्यात आला आहे.

गाईडलाईन मध्ये प्रामुख्याने आठ मुख्य स्टेप नुसार ऑनलाइन शिक्षण शिकवतानाच्या मार्ग दुरुस्त मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.यामध्ये प्लॅन (नियोजन),रिव्हीव्ह(उजळणी करणे) अरेंज (योजना),गाईड (मार्गदर्शन करणे) टॉक (बोलणे),असाईन (अभ्यास करायला सांगणे) ट्रॅक(एक विशेष पद्धती अभ्यासक्रम पुढे घेऊन जाणे)या महत्त्वाच्या सूचना करून त्या कशा अमलात आणायच्या याबाबत सांगितले आहे.
कोरोनाच्या काळात पूर्वीसारखे शाळेत दिले जाणाऱ्या शिक्षणाबाबत विचार करत बसण्यापेक्षा सध्यास्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून कसे दर्जेदार शिक्षण आपल्याला देता येईल यासाठी गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत तसा उल्लेख पत्रकात नमूद करण्यात आले आहे.पूर्वप्राथमिक वर्गासाठी ऑनलाइन स्क्रीन टाईम अर्धातास,पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दीड तास आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन तास अशी रोजची कालमर्यादा निश्चित केली आहे.

शिक्षकांनाही दिलासा 
शिक्षकांवर ताण येईल इतक्या ऑनलाइन तासिका घेण्याचे काम देऊ नये,असेही परिपत्रकात म्हटले आहे.शिक्षकांच्या मुलांचाही ऑनलाइन शाळा असतील त्यासाठी त्यांना संगणक किंवा फोन वापरावा लागू शकतो,याचा विचार करून त्यांच्या कामाचे नियोजन करावे दिवसातून एका शिक्षकाला दोन किंवा तीन तासांपेक्षा अधिक काळ ऑनलाइन तासिका घेण्याचे बंधन घालू नये,अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन शिक्षण हे अपंग विद्यार्थ्यांसाठी जिकरीचे ठरत आहे.राष्ट्रीय मुक्त विद्यालय अशा विद्यार्थ्यांसाठी ई-साहित्य तयार केले आहे.कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषेतील चित्रफिती निर्मिती केली आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे.  

 संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT