उत्तर महाराष्ट्र

सहा लाखांवरील सह्यांचे राज्यपालांना दिले निवेदन 

सम्राट महाजन

तळोदा : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि शेतीविरोधी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने देशभरात दहा लाख सह्या गोळा करण्यात आल्या. त्यापैकी केवळ महाराष्ट्रातच सहा लाख सह्या गोळा केल्या. त्याचे एक संयुक्त निवेदन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देण्यात आले. 


शेतकरी नेते राजू शेट्टी, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, आमदार कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, नितीन मते, राजा कांदळकर, अबिद शेख, चंद्रकांत म्हात्रे, सचिन बनसोडे, रोहित ढाले आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राभर सहा लाख ७५ हजारांहून अधिक सह्यांची निवेदने स्थानिक तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना सेवा दल पदाधिकारी आणि समविचारी कार्यकर्त्यांनी दिली. 


केंद्र सरकारने संसदेत पारित केलेले तीनही शेतीविषयक कायदे शेतकरी विरोधी असून, त्यातून देशातील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. या कायद्यांविरोधात गेली तीन महिने राजधानी दिल्लीच्या सरहद्दीवर शेतकऱ्यांचे अभूतपूर्व अहिंसक आंदोलन सुरू आहे. त्याची दखल घेण्याऐवजी हे शेतकरी आंदोलन निर्दयीपणे दडपण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. या दडपशाहीच्या निषेधासाठी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेतीविरोधी तिन्ही कायदे ताबडतोब मागे घेण्याची मागणी करण्यासाठी ही सह्यांची मोहीम हाती घेतल्याची माहिती राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांनी दिली. 

शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या माझ्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी गेले तीन आठवडे अविश्रांत पायपीट करुन समर्थनाच्या सह्या गोळा केल्या. शेतीविषयीचे ते तीन कायदे मागे घ्या. या आवाजात ज्यांचे स्वर मिसळले त्या परिचयाच्या आणि अपिरिचित प्रत्येकाला माझा सलाम. 
- गणेश देवी, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT