taloda.jpg 
उत्तर महाराष्ट्र

तळोदा नगरपालिकेची सभा चालली ४५ मिनीट...आणि ५२ विषय मंजूर! 

फुंदिलाल माळी

तळोदा  : वादग्रस्त बायोडिझेल पंपास ना हरकत दाखला देण्याचा विषय नामंजूर करून पालिकेच्या स्वच्छतागृह हलविण्याचा विषयाला स्थगिती देण्यात आली. बिअरबार परमिट रूमला ना हरकत दाखला देण्याचा विषय मंजूर झाला. वादग्रस्त विषयांवरून रद्द करावी लागलेली तळोदा लिकेची सर्वसाधारण सभा गुगल मीटद्वारे झाली. ५४ पैकी तब्बल ५२ विषय मंजूर करण्यात आले. 

पालिकेची सर्वसाधारण सभा २९ मेस बोलाविली होती. त्यासाठी अजेंड्याचे वाटपही झाले होते. मात्र, सत्ताधारी भाजपमध्ये बायोडिझेल पंपासाठी ना हरकत दाखला मिळण्याबाबत व बिअरबार परमीट रूमला व्यवसायासाठी ना हरकत दाखला देण्याचा मुद्द्यावरून मतभेद उफाळून आल्याने रात्रीतून सभा रद्द करावी लागली होती. 
नगराध्यक्ष अजय परदेशी व मुख्याधिकारी सपना वसावा पालिकेत उपस्थित होते. सर्व नगरसेवक आपापल्या घरी व्हिडिओद्वारे बैठकीला उपस्थित होते. नगराध्यक्ष परदेशी व मुख्याधिकारी वसावा यांनी नगरसेवकांना अजेंड्यावरील विषयासंदर्भात १ ते ५ व ६ ते १० असे गट करून म्हणणे मांडण्यास सांगितले. 

कॉंग्रेसचे नगरसेवक संजय माळी यांनी संचारबंदीत सूट मिळून काही तास व्यवसाय सुरू राहावेत, यासाठी पालिकेने ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याची मागणी केली. नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी यांनी व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली. 


नगरसेवकांनी ५२ विषयांना मंजुरी दिली. बायोडिझेल पंपाविषयी भाजप नगरसेवकांनी विरोधाची, तर कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी तटस्थतेची भूमिका घेतली. ४५ मिनिटांत ५२ विषयांना मंजुरी देण्यात आली. उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, काँग्रेसचे प्रतोद संजय माळी, गटनेते गौरव वाणी, नगरसेवक सुभाष चौधरी, रामानंद ठाकरे, अनिता परदेशी, हितेंद्र क्षत्रिय, प्रतीक्षा दुबे, अंबिका माळी, योगेश पाडवी, सूनयना उदासी, जितेंद्र सूर्यवंशी, हेमलाल मगरे, भास्कर मराठे, बेबीबाई पाडवी, अमोनोद्दीन शेख, शोभा भोई, सुरेश पाडवी, सुनीता पाडवी, कल्पना पाडवी व पालिकेचे प्रशासकीय अधिकारी राजेश पाडवी, लेखापाल विशाल माळी, बांधकाम अभियंता गावित, प्रभारी आरोग्य निरीक्षक अश्विन परदेशी, सचिन पाटील, सन्नी सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली... नवी मुंबईतून समोर आली महत्त्वाची बातमी, जाणून घ्या टॉस कधी

Ganesh Kale Murder: गणेश काळे हत्या प्रकरणात बंडू–कृष्णावर गुन्हा दाखल, आंदेकर गँगचा डाव उघड! पोलिसांनी दिली माहिती

पार्टीला जातोय! रात्री आईला सांगितलं, पहाटे अपघातात चुलत भावांचा मृत्यू; भरधाव वेगात हँडब्रेक ओढला अन् सगळं संपलं

Viral Story: २० रुपयांच्या नाण्यांत जपलेलं प्रेम… नवऱ्याने एका वर्षात बायकोसाठी जमा केलं 'सोनेरी' सरप्राइज! दुकानदारही भावूक

Latest Marathi News Update : लक्ष्मण हाके यांचा विखे पाटलांवर हल्लाबोल; “आरक्षणाचा अर्थच कधी समजला नाही!”

SCROLL FOR NEXT