KCPadv 
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबारला विषाणू तपासणी प्रयोगशाळा 

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : कोरोना संसर्ग प्रतिबंधात जिल्हा प्रशासनाने उत्तम कामगिरी केली आहे. यापुढेही असाच समन्वय ठेवत कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जिल्ह्या आदिवासी असून अनेक संसर्गजन्य आजारांची लागण होते, त्यासाठी नंदुरबार येथे कोरोना विषाणू संसर्ग तपासण्यासाठी प्रयोगशाळेबाबत पाठपुरावा करू, असे पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी आज येथे आढावा बैठकीप्रसंगी सांगितले. 

जिल्ह्यात विविध विभागाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात यावा. वन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही मंत्री पाडवी यांनी दिले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, उपजिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील आदी उपस्थित होते. 
ॲड. पाडवी म्हणाले, जिल्ह्याने कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजना योग्यप्रकारे राबविल्या आहेत. परराज्यातील मजुरांना पाठविण्याबाबत जिल्ह्याच्या कामगिरीचे राज्यस्तरावर कौतुक झाले आहे. येत्या काळातही संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात यावा. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना नागरिकांनी गर्दी टाळण्याची गरज आहे. तसे होत नसल्यास नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीकडे विशेष लक्ष द्यावे. 
 
रोजगार उपलब्ध केल्याबद्दल अभिनंदन 
मनरेगांअंतर्गत ग्रामरोजगार सेवकांना नवे जॉबकार्ड तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे. बांधावर फळझाडे लागवडीमुळे होणाऱ्या लाभाची माहिती द्यावी. चारोळी, महूची लागवड करून त्याच्या व्यावसायिक उपयोगाबाबत विचार व्हावा. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याबाबत आराखडा तयार करावा. आमचूर उत्पादनासाठी उपयुक्त आंब्याच्या जातींची लागवड करावी व कृषी विभागाने अशा जातींच्या नर्सरी तयार कराव्या. औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीतील उद्योगात असलेल्या संधीची माहिती युवकांना द्यावी. जिल्ह्यात अधिकाधिक वन धन केंद्र सुरू करण्यासाठी नियोजन करावे. सामाजिक वनीकरण विभागाने रोपवाटिकांची संख्या वाढवावी. मनरेगा अंतर्गत ६५ हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 

बाहेरगावी जाणाऱ्यांची नोंदणी रोजगार किंवा नोकरीच्या निमित्ताने गावातून इतर शहर अथवा जिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांची ग्राम पंचायतीत नोंदणी आवश्यक आहे. आपत्तीच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी हे आवश्यक आहे. त्याबाबत शासनस्तरावर निर्णय होण्यासाठी प्रयत्नशील आहे. नोंदणी झाल्यास तात्काळ मदत करणे शक्य होईल. 

रस्ते दुरुस्ती तात्काळ करा 
पुरहानीतील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावी. विविध योजनांचा माध्यमातून सुरू असलेली कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करावी. रस्त्याची कामे चांगल्या दर्जाची होतील याकडेही लक्ष द्यावे. पावसाळ्यात दुर्गम भागातील वाहतूक सुरळीत राहील यासाठी आपत्कालीन नियोजन तयार ठेवावे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सादरीकरणाद्वारे विविध विषयांची माहिती दिली. अमृत आहार योजनेचा लाभ 21 हजार स्तनदा व गरोदर मातांना तर १ लाख 13 हजार बालकांना देण्यात आल्याचे श्री.गौडा यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT