malnutrition release 
उत्तर महाराष्ट्र

कुपोषण मुक्तीसाठी धावले पुण्याचे ‘युवकमित्र’ 

सकाळ वृत्तसेवा

तळोदा (नंदुरबार) : अक्कलकुवा तालुक्यातील १५ गावातील २५९ कुपोषित बालकांना वायफोरडी फाउंडेशन, पुणे व युवकमित्र परिवार, नंदुरबार यांच्यातर्फे डीएम फेलो उपक्रमांतर्गत महाशक्ती न्यूट्रिशन अॅण्ड मल्टीव्हिटॅमिन सॅचेट वितरित करण्यात आले. एकूण ९ व्हिटॅमिन असणारे हे सॅचेट कुपोषित बालक व त्यांच्या माता यांना जीवनसत्त्व पुरवते, त्यामुळे हे फारच उपयुक्त आहे. 
अक्कलकुवा तालुक्यातील कुपोषण निर्मूलनासाठी युवकमित्र परिवार नंदुरबार या संस्थेचा प्रयत्न असून 'पोषण आहार जनजागृती उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी पिरामल फाउंडेशन डीएम फेलोशिपच्या १५ फेलो स्टुडंट्स यांनी आदिवासी पाड्यामध्ये जाऊन कुपोषित बालक शोधमोहीम राबवीत तब्बल २५९ बालकांचा शोध घेत सर्व बालक व त्यांच्या मातांना हे कीट वाटप करण्यात आले आहेत. यासाठी युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन, वायफोरडी फाउंडेशनचे व्यवस्थापक सागर मानकर यांनी न्यूट्रिशन कीट उपलब्ध करून दिले. कार्यक्रम यशस्‍वितेसाठी डीएम फेलो डिस्ट्रिक्ट मॅनेजर किशोर घरत, अक्कलकुवा तालुका डीएम फेलो प्रमुख दविंदर कौर यांच्या मार्गदर्शनाखाली डीएम फेलो शुभम शिरसोले, बेनिटो जायडस, मोहम्मद हबीब, अर्पित चौधरी, यश अहिहराव, तुषार महिरे, पियुष भादे, के. हबीब, सौमेन साऊ यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT