उत्तर महाराष्ट्र

निवडून आलेल्यांना, का नव्यांना संधी मिळणार

निवडून आलेल्यांना, का नव्यांना संधी मिळणार

कमलेश पटेल

शहादा (नंदुरबार) : न्यायालयाच्या आदेशामुळे इतर मागासवर्गीय प्रवर्गाची आरक्षण रद्द झाल्याने निवडणूक आयोगाने त्याजागी पोट निवडणूक घोषित केली. त्यानुसार तालुक्यातील चार गट व आठ गणांसाठी निवडणूक होत आहे. राजकीय पक्षांनी युद्धपातळीवर चाचपणीही सुरू केली आहे. मागे निवडून आलेल्या उमेदवारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार का उमेदवार बदलणार हे गुलदस्त्यातच आहे. दरम्यान ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने सर्वत्र नाराजीचा सूर आहे. या जागा जनरल मध्ये समाविष्ट केल्याने तालुक्यातील ओबीसी नेत्यांना राजकीय पक्ष उमेदवारीची संधी देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (nandurbar-zilha-parishad-election-new-candidate-political-party)

गेल्या निवडणुकीत चारही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार आल्याने निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यात काँग्रेस व भाजपने समान दोन जागांवर विजय मिळवला होता. त्यात काँग्रेसचे अभिजित पाटील (म्हसावद), शालिनी सनेर (कहाटूळ), भाजप कडून जयश्री पाटील (लोणखेडा), धनराज पाटील (पाडळदा) गटातून विजयी झाले होते. विजयानंतर तालुक्याला अभिजित पाटील व जयश्री पाटील यांच्या रूपाने दोन सभापती पदे ही तालुक्याला मिळाले होते. कालांतरानी न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्दबादल ठरवल्यानंतर ओबीसी जागा जनरल मध्ये समाविष्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्ष निवडून आलेल्या उमेदवाराला पुन्हा उमेदवारीची संधी देतात की नवख्यांना संधी दिली जाते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू

दरम्यान न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्दबादल ठरवल्यानंतर ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झालेला आहे. त्यांची नाराजी दूर व्हावी म्हणून राजकीय पक्षांतर्फे आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. तदनंतर निवडणुकीला स्थगिती मिळवण्यासाठी ही पाठपुरावा केला जात होता. परंतु आता निवडणूक तर लागलीच आहे आता मागास प्रवर्गातील जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी दिल्यास निदान त्यांना कुठेतरी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल अन्यथा असंतोष हा वाढतच जाईल. यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांना खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला उमेदवारीची संधी देऊन नाराजी दूर करता येईल. अर्थात या खुल्या जागेवर कोणीही उमेदवारी दाखल करू शकते आणि राजकीय पक्ष कोणालाही उमेदवारी देऊ शकते हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबाबत किंचितही शंका नाही परंतु प्रत्येक पक्षाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी तुल्यबळ उमेदवार देणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT