angawadi worker angawadi worker
उत्तर महाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांना इंग्रजीत माहिती भरण्याची सक्ती; उडतेय तारांबळ

अंगणवाडी सेविकांना इंग्रजीत माहिती भरण्याची सक्ती; उडतेय तारांबळ

सकाळ डिजिटल टीम

वडाळी (नंदुरबार) : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या (Nandurbar zilha parishad) महिला व बालकल्याण विभागाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पच्या अंगणवाडीची संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये भरतांना अंगणवाडी सेविकांची (Anganwadi sevika) तारांबळ उडत आहे. इंग्रजीमध्ये माहिती भरण्याची सक्ती बंद करून मराठीमध्ये माहिती भरण्याची मागणी होत आहे. (nandurbar-zp-anganwadi-sevika-compalsary-survey-form-fill up-english-language)

महाराष्ट्र शासनाने सर्व आस्थापनांना मराठीमध्ये काम करावेत, अशा सूचना असताना तसेच महाराष्ट्रात मराठी भाषा आस्थापनेला प्राधान्य असताना देखील अशी सक्ती का? अंगणवाडी हा प्रत्येकाचा शिक्षणाचा पाया असून येथूनच शिक्षणाची सुरुवात होते. अंगणवाडीमध्ये किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता तसेच ० ते ६ वर्ष वयोगट पर्यंतचे बालकांचे सर्वेक्षण त्यांची माहिती व देखभाल, त्यांना दिला जाणारा पोषण आहार, त्यांच्या आरोग्याची काळजी व त्याचबरोबर शिक्षण, त्यांना देत असलेल्या लसी बरोबरच त्या अंगणवाडीच्या क्षेत्रात येणाऱ्या लोकांची माहिती, त्या परिसरातील जन्मदर व मृत्युदर या सर्वांची सखोल माहिती या अंगणवाडी कार्यकर्तीकडे असते.

अनेकांना इंग्रजीचे पुरेसे नाही ज्ञान

पोलिओ लसीकरण असो की मग आत्ता आलेली कोरोनासारखी महामारी त्या सर्वांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण व माहिती संकलनचे काम या अंगणवाडी सेविका करतात. या अंगणवाडी सेविकापैकी अनेक सेविका या काही वर्षात सेवानिवृत्त होतील. त्यांचे त्यावेळचे शिक्षण देखील कमी आहे. बऱ्याच सेविकाना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नाही. परंतु जिल्हा परिषदने सर्वेक्षणाची सर्व माहिती इंग्रजीत भरणे सक्तीचे केले आहे, ही माहिती भरताना अंगणवाडी सेविकांची तारांबळ उडत आहे. परंतु आपली मुस्कटदाबी सहन करीत अंगणवाडी कर्मचारी या माहिती भरत आहेत. या माहितीत काही चूक झाली तर याला जबाबदार कोण? असा देखील प्रश्न उपस्‍थित होत आहे.

सक्‍ती नसावी, मराठीत भरण्याची मागणी

दुसरीकडे एक मुख्यसेविका यांच्याकडे किमान २० ते २५ अंगणवाड्यांचा कारभार आहे. त्यामुळे त्यांना देखील हे काम शक्य नाही. तालुकास्तरावर असलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, सांख्यिकी अधिकारी अशी कारकून मंडळी असताना देखील कमी शिक्षित असलेल्या अंगणवाडी सेविकांना या माहितीबाबत सक्ती का केली जाते, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तालुका कार्यालयामध्ये बसलेली मंडळींनी वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट टाकावी एवढीच अपेक्षा अंगणवाडी सेविका करीत आहेत. अंगणवाडी सेविका अत्यल्प मानधनात त्यांच्याकडून कोरोना काळात माझं कुटूंब माझी जबाबदारी, आरोग्य विभागाचे लसीकरण यासह अनेक कामे केली जात आहेत. इंग्रजीमध्ये माहिती भरण्याची सक्ती रद्द करून पूर्वीप्रमाणे प्रचलित असलेली मराठीमध्ये माहिती भरण्याची पद्धत सुरू ठेवावी, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

Satara Child Marriage: कुमारवयातच वाढतेय संसाराचे ओझे; प्रेमाच्या आड ‘छुप्या बालविवाहा’चे सातारा जिल्ह्यात वाढताहेत प्रकार, संकटाची चाहूल!

SCROLL FOR NEXT