उत्तर महाराष्ट्र

गुजरात सीमेवरील सीमा तपासणी नाका बंद करा, मंत्री दिवाकर रावतेंना केली मागणी ! 

दिलीप गावीत

विसरवाडी : आंतरराज्य गुजरात राज्याच्या सीमेवरील परिवहन विभागाचे आरटीओ सीमा तपासणी नाका गुजरात राज्याच्या धर्तीवर कायमचे बंद बंद करावे असे मागणीचे निवेदन सरपंच रामु सुरजी गावित ग्रुप ग्रामपंचायत बंधारफळी (बेडकी)ता.नवापूर यांनी परिवहन मंत्री, दिवाकर रावते यांना दिले आहे.


सरपंच गावित यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील आरटीओ सीमा तपासणी नाका चेक पोस्ट च्या मागील बाजूच्या बंधारफळी गावाच्या कच्च्या रस्त्याने नियमांना डावलून ओव्हरलोड गाड्या आरटीओच्या अनाधिकृत कर्मचारी (पंटर) महसूल बुडवून हजारो गाड्या पास करतात. त्यामुळे गावाच्या रस्त्याची दुरावस्था, प्रदूषण  वाढणे,  तसेच वाहनचालक गावातील महिलांचे नाव घेणे असले प्रकार होवू  लागले आहे. याबाबत नवापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहे त्यामुळे  हे चेक पोस्ट बंद करावे अशी मागणी केली निवेदनातून केली आहे. 

करोडो रुपयांचा महसुल बुडतोय 
सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बेडकी ता. नवापूर आंतरराज्य सीमा तपासणी आरटीओ चेक पोस्ट वर सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे. वजन काट्यात देखील मोठा झोल केला जात आहे. ओव्हरलोड गाड्या आरटीओच्या पंटर अनाधिकृत कर्मचारी महसूल बुडवून चेक पोस्ट च्या मागील बाजूच्या बंधारफळी गावाच्या रस्त्याने हजारो गाड्या पास करत असल्याने शासनाचा करोडो रुपयांच्या सेवा कर जीएसटी बुडवीला जात आहे. त्यामुळे गुजरात राज्याच्या धर्तीवर बंद केलेले आरटीओ तपासणी नाके मोजे बेडकीचे सुद्धा कायमचं बंद करावे मंत्री रावतेंना केली आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT