उत्तर महाराष्ट्र

चाक शिक्षण संस्थेने रोखला बालविवाह 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - दोन वर्षांपूर्वी शाळाबाह्य म्हणून आढळून आलेल्या इयत्ता आठवीतील मुलीचा काल (ता.21) होणारा बाल विवाह "चाकं शिक्षणाची' या संस्थेने नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या मदतीने रोखला. 

सुनीता (नाव बदलले) इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेणारी वज्रेश्वरी झोपडपट्टी (पंचवटी, नाशिक) तील विद्यार्थिनीचा विवाह बुधवारी मोतीनगर (कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. नगर) येथे मुकेश नारायण शिंगडे, (रिक्षाचालक) याच्यासोबत ठरविला होता. 

चाकं शिक्षणाची या संस्थेच्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात दोन वर्षांपूर्वी सुनीता ही शाळाबाह्य असल्याचे आढळून आली. चर्चा केली असता सौंदाने (ता. मालेगाव) येथील आश्रमशाळेत भीषण पाणीटंचाईमुळे शाळा मध्येच सोडून नाशिकला आली. तिला पुन्हा शाळेत जाण्यास "चाकं'ने प्रोत्साहन देऊन पंचवटी येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे दाखल करण्यात आले. मात्र, आई- वडील दोघेही दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असतात व मुलीकडे लक्ष देण्यास कोणी नसल्याने सुनीताचा विवाह करत आहोत, असे तिच्या आईने सांगितले. मात्र, सुनीताचा या विवाहास मान्यता नव्हती, म्हणून ती संस्थेच्या फिरत्या शाळेत येऊन सामाजिक कार्यकर्ते हेमंत भामरे यांना भेटून विवाह थांबवण्याची तिने विनंती केली. भामरे यांनी शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांना भेटून दोघांनी पुढील विवाह थांबण्यासाठीची आखणी केली. हा बालविवाह रोखण्याबाबत संस्थेकडून नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांना निवेदन देण्यात आले. पोलिस उपअधीक्षक अरुंधती राणे यांनी नगर पोलिस अधीक्षक कार्यालयाला फॅक्‍स केला. अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालयाने वर पक्षांना नोटीस देऊन, तसेच प्रत्यक्ष बोलावून लग्न रोखत असल्याचे लेखी लिहून घेतले. यामुळे आज होणारा हा बालविवाह रोखण्यात चाकं संस्थेला यश आले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT